सांगोला तालुका

माणगंगा परिवारातर्फे उल्लेखनीय कार्य केलेल्या मान्यवरांना माणगंगा गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार – नितीन (आबासाहेब) इंगोले

सांगोला ( प्रतिनिधी): अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या माणगंगा परिवार अर्बन को ऑप क्रेडिट सोसायटी सांगोला यांच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींना जीवन गौरव पुरस्कार व माणगंगा गौरव पुरस्कार देवून सन्मानित करण्यात येणार आहे. २६ जानेवारी रोजी सायंकाळी चार वाजता एमबीएम मॉल, सांगोला येथे कार्यक्रम संपन्न होणार आहे.
डॉ.डी. वाय.पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ.पी.डी. पाटील, आमदार शहाजीबापू पाटील, माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील, पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ.बाबासाहेब देशमुख, जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.
तरी या कार्यक्रमास तालुक्यातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, साहित्य क्षेत्रात कार्य करणाऱ्या मान्यवरांनी उपस्थित राहावे असे आवाहन माणगंगा परिवाराचे संस्थापक अध्यक्ष नितीन (आबासाहेब) इंगोले यांनी केले आहे.
नितीन (आबासाहेब) इंगोले यांनी ग्रामीण भागातील सर्वसामान्यांना मुख्य आर्थिक प्रवाहात आणण्याच्या हेतूने माणगंगा परिवार अर्बन को ऑप क्रेडिट सोसायटी या संस्थेची स्थापना केली. पारदर्शकता, विश्वासाहर्ता, ग्राहकाभिमुखता या मूल्याचे पालन करून अल्पावधीतच संस्थेने ग्राहकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. आठ हजारांहून अधिक समाधानी सभासदांच्या सहकार्याने तृतीय वर्षामध्ये पदार्पण करत संस्थेने ठेवीदार, कर्जदार, ग्राहकांचा विश्वास संपादन केला आहे. याच निमित्ताने सांगोला शहरातील वैद्यकीय, शैक्षणिक, क्रीडा, साहित्य, कला, कृषी, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या मान्यवरांना माणगंगा परिवारातर्फे माणगंगा गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील व सांगोला तालुक्यातील पहिले एम.एस. सर्जन डॉ. अमर शेंडे यांना माणगंगा जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच जेष्ठ साहित्यिक डॉ.कृष्णा इंगोले, शिक्षण व कृषी विकास प्रतिष्ठान, मेडशिंगीच्या सचिवा सुवर्णा दिलीप इंगवले, श्री श्री श्री रुद्रपशुपती कोळेकर महाराज, गुरुकृपा शेतकरी संघ ,रोटरी क्लब सांगोला, गुळमिरे उद्योग समूहाचे सोमनाथ गुळमिरे, गौडवाडी येथील आंतरराष्ट्रीय खेळाडू साक्षी सरगर, सांगोला अर्बन को-ऑप.बँकेचे संस्थापक चेअरमन डॉ. प्रभाकर माळी, राज्यस्तरीय भालाफेक स्पर्धेत सुवर्णपदक विजेता नीरज महारनवर या सर्वांना माणगंगा परिवारातर्फे माणगंगा गौरव पुरस्कार देवून सन्मानित करण्यात येणार आहे. तरी या कार्यक्रमास तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन माणगंगा परिवाराचे संस्थापक अध्यक्ष नितीन (आबासाहेब) इंगोले यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!