सांगोला तालुकामहाराष्ट्र

सांगोला बसस्थानकांची अहमदनगर स्वच्छता सर्वेक्षण समितीकडून पाहणी….स्वच्छतेबाबत कामकाजाचे केले कौतुक..

सांगोला एसटी बस आगारात हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सर्वेक्षण अभियान अंतर्गत राज्य परिवहन महामंडळाच्या अहमदनगर विभागाच्या सर्वेक्षण समितीचे अधिकारी श्री शिरसाट, एकशिंगे  समितीने सांगोला आगारास भेट दिली त्यावेळी त्या समितीचे स्वागत आगार व्यवस्थापक श्री निसार अहमद इब्राहिम नदाफ स्थानक प्रमुख सागर कदम यांच्या हस्ते करण्यात आले
“स्वच्छ सुंदर बस स्थानक’ अभियानांतर्गत सांगोला बस स्थानकांची एसटीच्या अहमदनगर विभागातील स्वच्छता सर्वेक्षण समितीने पाहणी केली त्यांच्यासोबत सांगोला आगाराचे प्रमुख निसार इब्राहिम नदाफ कार्यशाळा प्रमुख पृथ्वीराज पारसे स्थानक प्रमुख सागर सदाशिव कदम वाहतूक नियंत्रक प्रशांत चंदनशिवे वरिष्ठ लिपिक टकले ढोले वाहक निळकंठ वसेकर आपुलकी प्रतिष्ठानचे राजेंद्र यादव रमेश अण्णा देशपांडे, अरविंद केदार,पत्रकार जगदीश कुलकर्णी प्रवासी मित्र निलेश नष्टे  पोलिस मित्र आदर्श यादव ओंकार घोडके यांच्यासह आदी समिती बरोबर उपस्थित होते. सांगोला एसटी आगाराचे योग्य नियोजन स्वच्छतेबाबत नियोजनाचे कौतुक समाधान व्यक्त केले.
सांगोला एसटी स्टँड परिसर डेपो व परिसर स्थानकात असलेल्या प्रसाधनगृहांची स्वच्छता, बस स्थानकाचे इमारतीचे रंगकाम असलेले फलक  आगारात रंगरंगोटी करून नवीन फलक, फलाटावरील बोर्ड, सवलतीचे बोर्ड, वेळापत्रक स्वच्छतागृह आदी सुविधांबाबत समाधान व्यक्त करण्यात आले. सर्व एसटी चालक वाहक कर्मचारी अधिकारी एसटीच्या उत्पन्नवाढीसाठी विशेष प्रयत्न असतात. विशेष सहलीचे आयोजन केले जाते.  स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सोय केली आहे स्थानकामागे असलेले स्वच्छतागृह महिलांची स्वच्छतागृहांची पाहनी करण्यात आली त्यावेळी समितीने आगार परिसर तसेच स्थानकावरील परिसर व स्वच्छता याची देखरेख केली व सांगोला आगाराच्या कामकाजाबद्दल समाधान व्यक्त केले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!