तिप्पेहाळी येथे रामा फलटणे ट्रस्ट कडून उलेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवर व्यक्तींचा सन्मान सोहळा संपन्न…

सांगोला तालुक्यातील तिप्पेहाळी येथे दुसऱ्या महायुद्धातील शूरवीर ते भारतमातेच्या स्वातंत्र्या साठी एका सैन्यदलातील फलटण चे नेतृत्य करणारा योद्धा “स्वातंत्रसैनिक” रामचंद्र कृष्णा नरळे ऊर्फ रामा फलटणे यांचे प्रेरणेतून दिला जाणारा सन्मान हा दिमाखदार सोहळा संपन्न झाला. रामचंद्र कृष्णा नरळे व विठोबा कृष्णा नरळे यांच्या पुण्यतिथी निमित्य अनेक समाजउपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करनेत आले होते. पूज्यनीय व जगतगुरू तुकाराम महाराज यांचे वंशज वंदनीय हरिप्रसाद देहूकर महाराज पंढरपूर व तिप्पेहाळी भजनी मंडळ यांची सुवाद्य भजन व किर्तनसेवा कार्यक्रम सुरवातीस झाला. तदनंतर गेल्या वर्षीप्रमाणे विविध क्षेत्रामध्ये प्रतिकूल परस्थितीतही उतुंग भरारी घेऊन पंचक्रोशीतील समाज बांधवांचा सन्मान वाढवणाऱ्या व तरुण पिढीला राजमार्ग दाखवणाऱ्या काही निवडक व्यक्तींचा सन्मान करण्यात आला. तदनंतर शाहीरसम्राट डॉ देवानंद माळी यांचा लोकशाहीर गीतांचा तथा समाज प्रबोधनाचा कार्यक्रम झाला.
स्वातंत्रसैनिक रामा फलटणे चॅरिटेबल ट्रस्ट पुणे- तिप्पेहाळी यांचेकडून विविध क्षेत्रांमध्ये उतुंग झेप घेतलेल्या सन्माननीय व्यक्तींचा सत्कार रामा फलटणे फार्महाउस वर मान्यवर मंडळींच्या हस्ते व सन्माननीय ग्रामस्त आणि हितचिंतकांच्या उपस्थितीत तेजोमय वातावरणात संपन्न झाला. मान्यवर मंडळींचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरवन्यात आले.
१) कुस्ती क्षेत्रात उतुंग भरारी व सलग ३ गोल्ड मेडल जिंकून तिप्पेहाळी गावाच्या वैभवात भर घालणाऱ्या पैलवान दत्ता नरळे यांचा सत्कार शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व खुराखासाठी रोख १०१११ रूपये देऊन करण्यात आला.
२) पैलवान सागर चौगुले याचा सत्कार सन्मानचिन्ह व रोख ५१११ देऊन करण्यात आला.
३) अध्यामिक खेत्रात उतुंग उंची गाठनाऱ्या आणि समाजप्रोभोधनाचे धडे देणाऱ्या अनुक्रमे ह भ. प. भगवान सांगोलकर गुरुजी, ह. भ. प. अंकुश रामहरी बजबळकर, ह. भ. प. बाबासाहेब जनार्धन नरळे व यूवा भारूडकर संदीप मोहिते या सर्व मान्यवर व्यक्तींचा यथोचित सत्कार शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन करण्यात आला.
४) शिक्षण, राजकारण, समाजकारण या सर्वच क्षेत्रात झोकून देणाऱ्या प्रोफे दत्ता नरळे यांचा अष्टपैलू व्यक्तिमत्त्व म्हणून सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
५ ) सासरे अंधरुणाला खिळून असताना त्यांची अंघोळीपासून सर्व सेवा आपल्या स्वतःच्या बापापेक्षाही जास्त करणाऱ्या सुसाबाई नामदेवराव नरळे यांचा “ आईसमान सूनबाई” हा बहुमान देऊन व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
६) आर्मी सैनिक, वाऱ्याच्या वेगाने धावणारा धावपटू प्रशांत आलदर यांचा सत्कार सन्मान देऊन त्यांच्या “मुंबई मॅरॉथॉन विनर” या किताबा साठी गौरवण्यात आले.
७) आदर्श शिक्षिका जयनंदा कोळेकर मॅडम यांना आदर्श शिक्षिका म्हणून गौरवचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
८) अतिशय तळमळीने जनतेशी सेवा करणाऱ्या तलाठी श्री योगेश्वर बोथमवार यांचा सत्कार उत्तम “ प्रशासक” म्हणून करण्यात आला.
९) श्री रामभाऊ खांडेकर हे शिवहिंदुस्तान मंडळांच्या वतीने दरवर्षी देशसेवा बजावणाऱ्या व्यक्तींचा यथोचित सत्कार करतात. त्यांनाही सन्मानचिन्ह देउन गौरवण्यात आले.
१०) शाहिररत्न डॉ देवानंद माळी आणि टीव्ही फेम प्रथ्वीराज माळी यांचाही गौरवचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी शेकाप पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ बाबासाहेब देशमुख, आटपाडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शरद मेमाणे पोलिस निरीक्षक दगडु हाके,सोलापूर जिल्हा दूध संघाचे संचालक मारुतीराव ढाळे, मा सरपंच बाबासाहेब नरळे- फलटणे, पांडुरंग नरळे- फलटणे,श्री नामदेवरव बजबळकर, सरपंच हरिभाऊ सरगर, मा सरपंच काका नरळे, प्रकाश माने, सामाजिक कार्यकर्त्या वंदना संजय सरगर, भगवान वस्ताद, वस्ताद दगडू चौगुले, पत्रकार जगदीश कुलकर्णी, मा सरपंच दादासाहेब व्हनमाने, सरपंच अरुण बजबळकर, विलास फलटणे, इंजीनियर अशोक आबा नरळे – फलटणे, श्रीमंत अण्णा बजबळकर, मा सरपंच तानाजी नरळे, पोलिस पाटील राजू करांडे, विश्वनाथ सांगोलकर, सरपंच गजानन हिप्परकर, दुर्योधन हिप्परकर, सुहास माने, करांडे सर, गोडसे सर,अलका मॅडम यांचेसह पंचक्रोशीतील अनेक सन्माननिय नागरिक, नेतेमंडळी, फलटणे परिवाराचे हितचिंतक उपस्थित होते.



