जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गणेश नगर येथे भोंडला खेळ संपन्न.*

नाझरा(वार्ताहर):- महाराष्ट्राच्या पारंपारिक खेळांमध्ये विविध प्रकारचे खेळ सध्या मोबाईलच्या स्क्रीन मुळे हद्दपार होत चालले आहेत.लगोरी,खो खो,कबड्डी यासारख्या मैदानी खेळांबरोबरच काही पारंपारिक खेळ ही पूर्वी खेळले जायचे,परंतु अलीकडे मोबाईल मुळे विविध प्रकारचे खेळ मुलांना माहीतच होत नाहीत. मोबाईलच्या विविध प्रकारच्या गेम मध्ये अडकलेल्या मुलांना यातून बाहेर काढण्यासाठी चोपडी केंद्रातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गणेश नगर येथील मुख्याध्यापक राजाराम बनसोडे व सहशिक्षिका रूपाली पवार यांनी विविध पारंपारिक पद्धतीच्या खेळांना पसंती देत विद्यार्थ्यांमध्ये पारंपारिक खेळाचे संस्कार रुजवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.
आज गणेश नगर शाळेच्या प्रांगणात भोंडला हा खेळ खेळण्यात आला.यामध्ये विद्यार्थ्यांना डब्यामध्ये सुका खाऊ आणण्यास सांगितलेला होता.विद्यार्थिनीने सर्वांसमोर डबा वाजवायचा आणि इतर विद्यार्थ्यांनी त्या डब्यात कोणता खाऊ आहे हे ओळखायचं.अतिशय गमतीदारपणे हा खेळ चालला त्याचबरोबर स्पीकर वरती विविध प्रकारची गाणी म्हणत चिमुकल्याणमध्ये एक उत्साह निर्माण झाला. हस्त नक्षत्राच्या मुहूर्तावर पावसाच्या प्रतीक्षेसाठी हा खेळ खेळला जातो.मैदानात बरोबर मध्यभागी हत्तीची मूर्ती ठेवण्यात आली आणि त्याच्याभोवती विविध प्रकारचे गाणी फेर धरून सादर करण्यात आली. यामध्ये परिसरातील पालकांनी सहभाग नोंदवला होता. विविध प्रकारचे खेळ कशा पद्धतीने खेळले जात होते या पाठीमागे असणारी भूमिका काय असते याचे सविस्तर वर्णन तेथील शिक्षकांनी करून दिले.
निश्चितपणे खेड्या गावात असणाऱ्या अशा प्रकारच्या शाळांमधून हे खेळ खेळले जात आहेत आणि मोबाईलच्या गेम मध्ये अडकलेल्या मुलांना मैदानाबद्दलची ओढ निर्माण होत आहे हे निश्चितच आशादायी चित्र आहे.या वेगळ्या उपक्रमांसाठी शाळेतील शिक्षकांना गटशिक्षणाधिकारी नवले सर व केंद्रप्रमुख गाडे सर यांचे वेळोवेळी मार्गदर्शन मिळत आहे.अशा प्रकारचे खेळ विविध शाळांमधून साजरे झाले तर पारंपारिक खेळांचे महत्त्व या पिढीला समजेल एवढं मात्र नक्की..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button