सांगोला तालुकाशैक्षणिक

ना झरा विद्यामंदिर  इंग्लिश  मेडीयम स्कूल मध्ये पालकांसाठी कार्यशाळा संपन्न

नाझरा (प्रतिनिधी) :- पालकांनी मुलांचा कल ओळखावा आणि त्यांना ज्या गोष्टीत आवड आहे त्यामध्ये त्यांना प्रोत्साहन द्यावे. त्याचबरोबर पालकांनी आपल्या मुलांसाठी जास्तीत जास्त वेळ दिला पाहिजे. आपली मुले कोणाच्या संगतीत असतात याकडे लक्ष द्यावे. पालकत्व हे सुजाण असले पाहिजे.असे प्रतिपादन एम.टी.एस.ई. स्कूल, सांगलीच्या प्राचार्य इंदिरा पाटील यांनी केले.
नाझरा विद्यामंदिर इंग्लिश मेडियम  स्कूल नाझरा येथे इ. नर्सरी ते ४थी  च्या पालकांसाठी आयोजित कार्यशाळेत  त्या बोलत होत्या.
यावेळी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका कु. मंगल पाटील  तसेच नाझरा विद्यामंदिर प्रशालेचे मुख्याध्यापक  गायकवाड सर यांच्या हस्ते सौ. इंदिरा पाटील मॅडम यांचा सत्कार करण्यात आला.तसेच यावेळी सांगोला इंग्लिश मीडियम स्कूलच्या  मुख्याध्यापिका मुख्याध्यापिका कु. सरिता कापसे मॅडमही उपस्थित होत्या.कार्यक्रमाची सुरूवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली. प्रमुख पाहुण्यांची ओळख कु. ऐश्वर्या रणपिसे मॅडम यांनी केली.
पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, पालकत्व ही आयुष्यभराची प्रक्रिया आहे . पालकांचे मुलांसोबत मित्रत्वाचे वर्तन असावे. आपल्या मुलांवर दडपण  न आणता त्यांच्या बरोबर मैत्रीपूर्ण संबंध ठेवावे. आपल्या मुलांना मोबाईलपासून दूर ठेवावे व त्यांना पुस्तक वाचनाची सवय लावावी.
मुलांच्या भावनांचा आदर करावा असे मत त्यांनी व्यक्त केले.. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.ऐश्वर्या रणपिसे मॅडम यांनी केले आणि आभार सौ .सोनाली सरगर मॅडम यांनी केले .तसेच हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!