भाई गणपतरावजी देशमुख यांच्या कार्याचा विद्यार्थीनी प्रेरणा घ्यावी- डॉ. अनिकेत देशमुख
डॉ. गणपतराव देशमुख महाविद्याय अंतर्गत मोजे सावे येथे विशेष श्रम संस्कार शिबिर उद्घाटन सोहळा संपन्न
सांगोला:- डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालय सांगोला अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजना समिती मौजे सावे येथे प्रमुख पाहुणे डॉ. अनिकेत देशमुख यांच्या उपस्थिती विशेष श्रम संस्कार उद्घाटन सोहळा संपन्न झाला.
सुरुवातीस संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करुन कार्यक्रमाची सुरुवात केली प्रमुख पाहुणे पुढे म्हणाले की, सावे गावामध्ये दि.25 जानेवारी 2024 ते 31 जानेवारी 2024 पर्यंत सात दिवसीय शिबिरामध्ये बालविवाह व स्वच्छ भारत अभियान मतदार जन जागृती जलव्यवस्थापन इत्यादी उपक्रम राबविताना विद्यार्थ्यांनी मनापासून कार्य केले पाहिजे तसेच जलव्यव्थापन मार्गदर्शन करताना ते म्हणाले की डॉ. गणपतराव देशमुख उर्फ आबासाहेब यांनी सांगोला तालुक्यामध्ये पाण्याविषय मोठ्या प्रमाणामध्ये कार्य केले आहे तसेच महाराष्ट्राच्या विधान सभे मध्ये पाण्या विषय प्रश्न मांडून आता सध्या सांगोला तालुका जलमय झाला आहे ते स्वर्गीय आमदार भाई गणपतराव देशमुख यांच्या कार्यामुळेच गणपतरावजी देशमुख म्हणजे महाराष्ट्र विधीमंडळ कामकाजाचे विद्यापिठ होते त्याच्या कार्याचा विद्यार्थीनी प्रेरणा घ्यावी
सदर कार्यक्रमामध्ये मनोगत व्यक्त करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सिकंदर मुलाणी म्हणाले की विदुर्थानी शिस्तीचे पालन करुन सावे गावामध्ये विशेष श्रम संस्कार मध्ये महाविद्यालयाच्या नावाप्रमाणे नाव लौकीक करावे.तसेच सावे सावे गावचे सरपंच मा. शिवाजीराव वाघमोडे यांनी आपल्या मनोगत मध्ये म्हणाले की आम्ही या शिबिरात सर्व ग्रामस्थ सहभागी होऊन सदर श्रमसंस्कार शिबीरास सर्व प्रकारचे सहकार्य करू असे संबोधित केले.
अध्यक्ष मनोगतामध्ये संस्था सचिव मा. विठ्ठलरावजी शिंदे यांनी आबासाहेबच्या मागे नेहमी असलेल्या सावे गावचे सविस्तर वर्णन केले.सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. अशोक वाकडे सर यांनी केले तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ सीमा गायकवाड तसेच आभार प्रदर्शन प्रा.ज्योतिबा हुरदुखे यांनी केले.
सदर कार्यक्रमाचे नियोजन प्रकल्प अधिकारी डॉ काकासाहेब घाडगे व डॉ नारायण आदलिंगे यांनी केले सदर कार्यक्रमास शिक्षक,ग्रामस्थ ,विद्यार्थी उपस्थित होते. सादर कार्यक्रम यशस्वी करणयास डॉ जयश्री काशीद यांचे सहकार्य लाभले.
One attachment • Scanned by Gmail