सांगोला तालुका

सांगोला येथील नॅशनल स्टडी सेंटरच्या सात विद्यार्थ्यांची तलाठी पदी नियुक्ती; सेंटर तर्फे सन्मान सोहळा संपन्न

सांगोला – शहरातील उद्योजक रमेश फुले सर संचलित नॅशनल स्टडी सेंटरच्या सात विद्यार्थ्यांनी तलाठी परिक्षेत नेत्रदीपक यश प्राप्त केले असुन त्याना नियुक्तीपत्र प्राप्त झाले आहे.त्यामूळे या गुणवंत व भाग्यवन्त विद्यार्थ्यांचा सत्कार  रमेश फुले सर  यांच्या हस्ते करण्यात आला.महाराष्ट्र शासनाने काही दिवसापुर्वी तलाठी परीक्षा घेतली होती.या परिक्षेत फुले यांच्या नॅशनल स्टडी सेंटर मधून रमेश विटेवर,शरद गोडसे,अनिल वगरे,शशीकला बंड़गर,विक्रम बाड ,प्रथमेश बाबर व आकांक्षा फुले यांची तलाठी पदी निवड झाली आहे.विशेष म्हणजे रमेश विटेवर,शरद गोडसे व अनिल वगरे हे सैन्य दलातून सेवानिवृत्त झालेले बहाद्दूर कर्मचारी आहेत.सर्वाना मागणी केलेल्या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली आहे.विद्यर्थ्यनी मन लावून अभ्यास केल्यास व स्टडी सेंटरचा जास्तीत जास्त वापर केल्यास निस्चीत यश मिळते,असे संचालक रमेश फुले  सर म्हणाले.
यशस्वी विद्यार्थ्यना  प्रसाद फुले सर व गौरी फुले मैडम यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.सदर स्टडी सेंटर  व नॅशनल टाइपिंग इंस्टीटयूट एस.टी.स्टँडला जवळ असुन अभ्यासासाठी लागणारे शांत व प्रसन्न वातवरण,इतर भौतिक सुविधा विद्यार्थ्यांना या ठिकाणी दिल्या जातात. अनेक विद्यार्थ्यांनी या स्टडी सेंटरचा व नॅशनल टाइपिंग इन्स्टिट्यूटचा लाभ घेऊन शासकीय नोकरी प्राप्त केल्याचे प्रसाद फुले सर यानी सांगितले.आजकाल मराठी तरुणाना शासकीय नोकरी मिळणे कठीण होत असताना ग्रामीण भागातील संस्थेमधून असे  विद्यार्थी सरकारी नोकरी मिळवत असल्या बद्दल इन्स्टिट्यूट व विद्यार्थ्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!