जि.प.प्रा. केंद्रशाळा, महुद बु शाळेत माहे फेब्रुवारीची शिक्षण परिषद संपन्न

जि.प.प्रा. केंद्रशाळा, महुद बु शाळेत माहे फेब्रुवारीची शिक्षण परिषद संपन्न झाली. या शिक्षण परिषदेचे अध्यक्षस्थान महुद शाळेचे मुख्याध्यापक विश्वनाथ जाधव सर यांनी स्वीकारले. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन विश्वनाथ जाधव सर, केंद्रप्रमुख बाळासो जाधव सर, विठ्ठलवाडी शाळेचे शिक्षक नितीन काटे सर यांच्या हस्ते करण्यात आले.
या शिक्षण परिषदेत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान-२०२४ , अन्य प्रशासकीय माहिती यावरती सखोल व अनमोल असे मार्गदर्शन केंद्रप्रमुख बाळासो जाधव सर , व दिलीप ढेरे सर यांनी केले. शिक्षण परिषदेची प्रस्तावना व सूत्रसंचालन श्रीमती वंदना पाटणे मॅडम यांनी केले. आभार प्रदर्शन दऱ्याबा येडगे सर यांनी मानले. या शिक्षण परिषदेत महुद केंद्रातील सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते.



