सांगोल्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निषेध; राजीनामा देण्याची मागणी….

सांगोला(प्रतिनिधी):-उध्दव ठाकरे व अदित्य ठाकरे यांचेवर देवेंद्र फडणवीस यांनी जे काही आरोप करा म्हणुन षडयंत्र रचले त्यामुळे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नैतिकतेने राजीनामा दयावा व शासनाने त्यांना तात्काळ पदमुक्त करावे, अशी मागणी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून तहसीलदार संतोष कणसे यांचेकडे काल शुक्रवार दि.26 जुलै रोजी निवेदनाव्दारे केली.
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी गृहमंत्री अनिलजी देशमुख यांना उध्दव ठाकरे व युवा सेना प्रमुख अदित्य ठाकरे यांचेवर नको ते आरोप करा आणि बदनामी करा म्हणुन देवेंद्र फडणवीस यांनी अनिल देशमुख यांना सांगितले होते. असे स्वतः दोन चार दिवसापुर्वी अनिल देशमुख यांनी प्रसार माध्यमासमोर सांगितले. त्यामुळे ई.डी., सी.बी.आय.चा गैरवापर करणारे महाराष्ट्रामध्ये अस्थिर वातावरण करणारे देवेंद्र फडणवीस यांचा जाहिर निषेध असून भविष्यात देवेंद्र फडणवीस यांचेकडून महाराष्ट्रामध्ये जातीय दंगली होणेची दाट शक्यता आहे. याची दखल शासनाने त्वरीत घ्यावी.
यानंतरहीे देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर शिवसेना नेत्यांवर चुकीच्या पध्दतीने काही कट कारस्तान करून शिवसेना नेते व शिवसेना अस्थिर करण्याचा प्रयत्न केला तर या देवेंद्र फडणवीस यांना जशास तसे उत्तर दिले जाईल. जे काही उध्दवसाहेब ठाकरे व अदित्य ठाकरे यांचेवर देवेंद्र फडणवीस यांनी जे काही आरोप करा म्हणुन षडयंत्र रचले त्यामुळे सध्या त्यांनी आपल्या पदाचा नैतिकतेने राजीनामा दयावा. आणि तो या शासनाने त्यांना तात्काळ पदमुक्त करावे.असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
सदर निवेदन देतेप्रसंगी युवासेना तालुकाप्रमुख सुभाष भोसले, तालुकाप्रमुख अरविंद पाटील उपतालुकाप्रमुख गोरख यजगर, तालुका संघटक हरिभाऊ पाटील, कमरूद्दीन खतीब, तुषार इंगळे, रघुनाथ ऐवळे, चंदन जाधव, अण्णासो बंडगर, सुदेश व्हनमाने, अतुल बेडग, समाधान चव्हाण, सागर चव्हाण, प्रतीक देशमुख, तानाजी गोडसे, दादासो सकट, तानाजी व्हनमाने, काका व्हनमाने, सचिन खंदारे, एकनाथ चौगुले, सचिन खंडारे आदी उपस्थित होते.



