सांगोला तालुका

भारतीय संस्कृती महान आहे: अविनाश महाराज भारती

सांगोला येथे ओम माने यांच्या वाढदिवसानिमित्त अविनाश महाराज भारती यांचा व्याख्यानाचा कार्यक्रम संपन्न

सांगोला/ प्रतिनिधी: भारत देशामध्ये सर्वत्र विविधता आढळून येते. ज्येष्ठ माणसातच आज तरुण दिसतोय. भारतासारखा देश व महाराष्ट्रासारखे राज्य इतर कोठेही नाही. आई, वडील व गुरुजन यामध्ये भारतीय संस्कृती सामावलेली आहे. भारतीय संस्कृती ही जगातील सर्वात महान संस्कृती मानली गेली आहे. संविधानामुळे व्यक्ती स्वातंत्र्य व लोकशाही अस्तित्वात आली. थोर महात्म्यांचा इतिहास हा सर्वांसाठी क्षणोक्षणी मार्गदर्शकाची भूमिका बजावतो आहे. असे विचार थोर व्याख्याते ह .भ.प.अविनाश महाराज भारती आंबेजोगाई यांनी सांगोला येथे व्यक्त केले.

सांगोला शहराच्या माजी लोकनियुक्त नगराध्यक्षा राणीताई माने व माजी नगरसेवक आनंदा माने यांचे चिरंजीव ओम माने यांच्या वाढदिवसानिमित्त सांगोला शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे मंगळवार दिनांक 21 नोव्हेंबर रोजी सायंकाळी आयोजित केलेल्या भारतीय संस्कृती व आजची तरुणाई या विषयावरील व्याख्यानामध्ये अविनाश महाराज भारती यांनी आपले विचार व्यक्त केले. सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे ह. भ .प .अविनाश महाराज भारती, माजी नगराध्यक्षा राणीताई माने, माजी नगरसेविका छायाताई मेटकरी ,धनगर समाज सेवा मंडळाचे माजी अध्यक्ष काशिलिंग गावडे, चेअरमन तायप्पा माने ,ज्ञानेश्वर गाडेकर,ओम माने यांच्या हस्ते पूजन करण्यात आले .त्यानंतर व्यासपीठावर चेअरमन तायाप्पा माने यांच्या हस्ते ह. भ .प .अविनाश महाराज भारती यांचा विठ्ठलाची मूर्ती भेट देऊन यथोचित सन्मान करण्यात आला .या कार्यक्रमासाठी ॲड. महादेव पारसे , धनगर समाज सेवा मंडळाचे माजी अध्यक्ष दत्तात्रय जानकर ,संभाजी ब्रिगेडचे जिल्हा उपाध्यक्ष राजू शिंदे ,संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रदीप मिसाळ, प्रताप इंगोले तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर पदाधिकारी व श्रोतावर्ग यांची उपस्थिती होती.

यावेळी पुढे बोलताना अविनाश महाराज भारती म्हणाले भारतीय संस्कृतीला थोर असा इतिहास आहे. पूर्वीचा इतिहास आज आपल्या पिढीला मार्गदर्शक ठरत आहे .ओम माने यांच्या वाढदिवसानिमित्त वैचारिक प्रबोधनाचा कार्यक्रम ठेवणे यात माने कुटुंबाचे वेगळेपण व मोठेपण आहे .असे विचार व्यक्त करीत स्त्रोता वर्गाला त्यांनी बौद्धिक मेजवानी दिली .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माधुरी चव्हाण इंदापूर यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!