सांगोला तालुकामहाराष्ट्र

सांगोला नगरपरिषद हदद्दीतील समस्येबाबत युवा सेनेच्यावतीने मुख्याधिकारी यांना निवेदन

सांगोला(प्रतिनिधी):-सांगोला नगरपरिषद हदद्दीतील समस्येबाबत युवा सेनेच्यावतीने मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे.

सांगोला शहरातील नगरपालिकेच्या हदद्दीतील नागरीकांची गैरसोय टाळणेबाबत शहराला उच्च दाबाने पाणी पुरवठा व्हावा. सांगोला शहरातील गटारे उघडी असल्याने व त्याची साफसफाई व्यवस्थित होत नसल्याने तसेच कचर्‍याची साफ सफाई म्हणावे तशी होत नसल्याने मच्छरांचा प्रादुर्भाव जास्त आहे. याचा बंदोबस्त होण्यासाठी ज्या फवारण्या केल्या जातात त्यामध्ये किटकनाशकाचे प्रमाण कमी असलेने धुर फवारणीने डास मरत नाहीत. त्यासाठी योग्य नियोजन करणे गरजेचे आहे. तसेच नगरपालिकेजवळून वाहणार्‍या ओढयात कचर्‍याचे प्रमाण जादा असल्याने सांड पाण्याचा निचरा योग्य पध्दतीने होत नाही. त्यामुळे दुर्गंधीचे प्रमाण वाढत आहे. त्याची विल्हेवाट लावून ओढयाची साफसफाई करण्यात यावी. तसेच सांगोला नगरपालिकेच्या बहुतांश भागात धारकांच्या बांधकामांना अधिकृत म्हणून बांधकाम परवाने दयावेत. विना परवाना बांधकाम धारकाकडून दुप्पट दराने विविध करांची वसुली केली जात असलेने शहरातील नागरीक त्रस्त व नाराज आहेत. त्यावर नियंत्रण राखणेत यावेत. अन्यथा वेगळ्या पध्दतीने धरणे आंदोलन, उपोषण, रास्ता रोको यासारखे सनदशीर मार्गाने आंदालने करावी लागतील याची सर्व जबाबदारी नगरपरिषद प्रशासनाची राहील असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

निवेदन देतप्रसंगी शहरप्रमुख सौरभ सुधाकर चव्हाण, उपजिल्हाप्रमुख रघुनाथ गायकवाड, तालुकाप्रमुख सुभाष भोसले, शहर प्रमुख सौरभ चव्हाण, शहर चिटणीस योगेश जुंदळे, शाखाप्रमुख समाधान चव्हाण, शाखा प्रमुख गोपाल म्हेत्रे, सागर वाघमारे, निहाल यादव, शिवराज घालमे उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!