ब्राईट फ्युचर आयआयटी मेडिकल अँड अकॅडमी मधून गोरगरिब कुटुंबातील विद्यार्थ्याचे स्वप्न साकार झाले याचा मला मनस्वी आनंद : डॉ. पियूषदादा साळुंखे पाटील

ब्राईट फ्युचर आयआयटी मेडिकल अँड अकॅडमीचा विद्यार्थी विराज गाडेकर जेइइ मेन्स या परीक्षेमध्ये 98.24 टक्के मार्क घेऊन उत्तीर्ण

 

सांगोला तालुका जरी पाण्याने टंचाईचा तालुका असला तरी येथे बुद्धीचा मात्र सुकाळ आहे असे अनेकांनी सांगितले आहे. परंतु येथील गोरगरीब कुटुंबातील होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध नसल्याने बहुसंख्य विद्यार्थ्यांना आपले इच्छा आणि स्वप्न मारावे लागत होते. मात्र विद्यार्थ्यांच्या जिद्द चिकाटी आणि त्यांच्यामधील धडपड पाहून आपल्या सांगोल्यात ब्राईट फ्युचर आयआयटी मेडिकल अँड अकॅडमीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण देण्याचा प्रयत्न केला. आणि आज त्या प्रयत्नाला निश्चितपणाने यश मिळाले आहे. विराज सुरेश गाडेकर जेइइ मेन्स या परीक्षेमध्ये 98.24 टक्के मार्क घेऊन तो उत्तीर्ण झाला आहे. तर यापुढे ( नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी) मध्ये प्रवेश मिळाला आहे. ब्राईट फ्युचर आयआयटी मेडिकल अँड अकॅडमी मधून गोरगरिब कुटुंबातील विद्यार्थ्याचे स्वप्न साकार झाले याचा मला मनस्वी आनंद असल्याचे प्रतिपादन डॉ. पियूषदादा साळुंखे पाटील यांनी केले.

ब्राईट फ्युचर आयआयटी मेडिकल अँड अकॅडमीने गरुड झेप घेतली आहे. अकॅडमीतील पहिला विद्यार्थी विराज गाडेकर जेइइ मेन्स या परीक्षेमध्ये 98.24 टक्के मार्क घेऊन घवघवीत यश संपादन केल्याबद्दल ब्राईट फ्युचर आयआयटी मेडिकल अकॅडमीच्या वतीने त्याचा व त्याचे पालक यांचा मानाचा फेटा आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या यशाबद्दल शुभेच्छा देत असताना अकॅडमी चे सर्वेसर्वा डॉ. पियूषदादा साळुंखे पाटील बोलत होते. यावेळी अकॅडमीचे अनिल येलपले सर, सुरेश गाडेकर, वैशाली गाडेकर यांच्यासह अकॅडमीचे सर्व शिक्षक कर्मचारी वृंद उपस्थित होते.

पुढे बोलताना डॉ. पियूषदादा साळुंखे पाटील म्हणाले, शिक्षण म्हणजे वाघिणीचे दूध आहे. शिक्षणाने माणूस समृद्ध होतो. यामुळे विद्यार्थ्यांनी भविष्यामध्ये आपले ध्येय निश्चित करण्यासाठी आणि करिअर बनवण्यासाठी आज आणि आत्तापासून जिद्द चिकाटी आणि शिक्षणाच्या जोरावर प्रयत्न करावे. आज विराज गाडेकर यांचा सत्कार केला जात आहे असाच सत्कार येथील इतर विद्यार्थ्यांचा व्हावा अशी अपेक्षा असून ही अपेक्षा येथील विद्यार्थी प्रामाणिकपणे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करतील. त्यासाठी ब्राईट फ्युचर आयआयटी मेडिकल अँड अकॅडमी त्याच पद्धतीने विद्यार्थ्यांना अध्यापन करेल असा विश्वास संस्थापक अध्यक्ष डॉ. पियूषदादा साळुंखे पाटील यांनी दिला.
ब्राईट फ्युचर आयआयटी अँड मेडिकल अकॅडमी साठी आज सोनेरी क्षण आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्याला एक चालना देण्याचे काम केले. आज तो विद्यार्थी तालुक्यातून चमकला आहे हे अकॅडमीचे यश आहे. यापुढील काळातील अशाच पद्धतीचे विद्यार्थी तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यात आणि राज्यात देखील नाव कमवतील असा विश्वास अनिल येलपले सर यांनी दिला.

यावेळी विराज गाडेकर यांनी सांगितले की, शिक्षणाच्या पद्धती बदलत असताना ब्राईट फ्युचर आयआयटी मेडिकल अकॅडमीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्पर्धेमध्ये टिकून राहण्यासाठी आणि त्यांचे करिअर उज्वल बनवण्यासाठी निश्चितपणे उत्कृष्टपणे अध्यापन केले जात आहे. येथील जेइइ मेन्स पास होण्यासाठी राजस्थान (कोटा) येथिल तज्ञ मार्गदर्शक प्राध्यापक वर्गाकडून वेळोवेळी ऑनलाईन/ऑफलाईन मार्गदर्शन व डाऊट सेसन , रात्रीचा अभ्यास हे या अकडेमीचे यशाचे गमक म्हणता येईल. येथील शिक्षण मला यापुढे शिक्षणासाठी फायदेशीर ठरेल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक उद्धव मोरे सर यांनी तर आभार दिलीप राठोड सर यांनी मांनले. या कार्यक्रमासाठी अकॅडमीचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

———————————
त्याच्यावर नियम लादण्यापेक्षा अभ्यास करण्यासाठी पालक म्हणून त्याला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला. त्याच्यावर मोठा विश्वास ठेवून त्याला मोकळी दिली त्या मोकळी तिचा आणि विश्वासाला पात्र राहुन विराज ने जे यश संपादन केले त्यामागे ब्राईट फ्युचर अकॅडमी चे सर्वात मोठे योगदान आहे.
वैशाली सुरेश गाडेकर पालक

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button