जिद्दीच्या जोरावर यशाला गवसणी घाला- प्राचार्य गायकवाड

नाझरा(वार्ताहर ):- बारावी हा आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा असतो याच बारावीच्या वर्षात आपले ध्येय निश्चित होत असते आपल्या आई वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवून जो विद्यार्थी शिकतो तो खऱ्या अर्थाने यशवंत होतं आपल्यात असलेल्या जिद्दीच्या जोरावर यशाला गवसनी घालण्याचे सामर्थ्य तुमच्यात आहे असे प्रतिपादन नाझरा विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य अमोल गायकवाड यांनी केले
ज्युनिअर कॉलेजमध्ये बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या शुभेच्छा समारंभात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर पर्यवेक्षक मधुकर धायगुडे, प्राध्यापक प्रकाश म्हमाने आदी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक युवराज लोहार यांनी केले. या यावेळी सारिका शेळके, अनुराधा आलदर, मुस्कान काझी, साक्षी गायकवाड, माया बनसोडे, प्राजक्ता पांढरे यांनी आपल्या मनोगत आतून शाळेबद्दलची कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी प्रा. नारायण पाटील,प्रा. महेश विभुते यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. मोहन भोसले यांनी केले तर आभार प्रा. बंडगर मॅडम यांनी मांडले.