राजकीयशैक्षणिकसांगोला तालुका

आपुलकी प्रतिष्ठान, जेसीबी असोसिएशन व सांगोला बस आगार यांच्या संयुक्त विद्यमाने एस. टी. डेपो व बसस्थानकात स्वच्छता अभियान

सांगोला ( प्रतिनिधी )- आपुलकी प्रतिष्ठान, जेसीबी असोसिएशन सांगोला व सांगोला बस आगाराचे अधिकारी, कर्मचारी यांच्या संयुक्त विद्यमाने एस. टी. डेपो व बसस्थानक सांगोला येथे ०८ जेसीबी, १ ट्रॅक्टर आणि २ टिपर यांच्या साहाय्याने स्वच्छता अभियान पार पडले.
 म. गांधी जयंती निमित्त आयोजित या स्वच्छता अभियानाचा शुभारंभ सांगोला पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी, सोलापूर ग्रामीण भाजपाचे जिल्हाध्यक्ष तथा आपुलकीचे सदस्य चेतनसिंह केदार -सावंत यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला.  यावेळी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सर्व जेसीबी चालकांचा आपुलकी कडून सन्मानचिन्ह व फुलझाड रोप देऊन यथोचित सन्मान करण्यात आला.
या अभियानासाठी सतीश पाटील, नाना गायकवाड, दत्ता इंगोले, राजू चोरमुले, शंकर लिंगे, रमेश जाधव, सतीश सावंत, धर्मराज केदार यांनी स्वखर्चाने जेसीबी देऊन तर सतीश इंगोले व अरविंद केदार यांनी टिपर, पांडुरंग गायकवाड यांनी फळी ट्रॅक्टर देऊन या उपक्रमासाठी बहुमोल असे सहकार्य केले. यावेळी आपुलकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र यादव, सचिव संतोष महिमकर, अरविंद केदार, रमेशअण्णा देशपांडे, अण्णासाहेब मदने, सुधाकर लिगाडे, सतिश राऊत, डॉ. अनिल कांबळे, वसंत सुपेकर, दादा खडतरे, प्रकाश महाजन, प्रथमेश यादव, डेपो मॅनेजर निसार अहमद इब्राहिम नदाफ, सहायक कार्यशाळा अधीक्षक पृथ्वीराज पारसे, स्थानक प्रमुख सागर कदम आदीसह एस टी चे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!