रामेश्वर मासाळ यांच्या निवडीने मंगळवेढा तालुक्यात जल्लोष

नंदेश्वर (प्रतिनिधी)-युवक नेते गोणेवाडीचे माजी सरपंच रामेश्वर मासाळ यांची सोलापूर जिल्ह्याच्या (अजित पवार गट) राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मंगळवेढा शहरासह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतिषबाजी करत पेढे भरवुन आनंद व्यक्त करण्यात आला.
रामेश्वर मासाळ यांनी गरजू विद्यार्थ्यांना मदत करणे,गावाच्या समस्यासह मंगळवेढा तालुक्यातील आलेल्या ग्रामीण भागातील वृद्ध नागरिकांना तहसील कचेरी,प्रांत कार्यालय, महाविद्यालये या ठिकाणी विविध शासनाच्या सवलती व कागदपत्रे काढण्यासाठी मार्गदर्शन व मदत करणे.विविध स्पर्धांचे आयोजन करणे व त्यासाठी प्रोत्साहन देणे, शालेय साहित्य वाटप करणे,वृक्षारोपण करणे,गरजूंना मदत करणे,शालेय विद्यार्थिनींना सायकल वाटप करणे यासारखी त्यांनी अनेक सामाजिक कामे केलेले आहेत म्हणून त्यांची या सोलापूर जिल्ह्याच्या कार्याध्यक्षपदी निवड झाली आहे. निवडीनंतर मंगळवेढा शहरासह ग्रामीण भागातील युवक वर्ग, महिला,विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांमधून मोठ्या प्रमाणात त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
(रामेश्वर मासाळ फोटो घेणे)