सांगोला तालुकामहाराष्ट्र

सांगोला शहरातील एखतपुर रोड येथील भाजी मंडई सुरू होणार तरी केव्हा ?

बांधकाम पूर्ण होऊनही इमारत पडली धूळखात.

सांगोला शहराचा चारही बाजूने मोठ्या प्रमाणात विस्तार झाला आहे शहराच्या हद्दवाढ भागात तसेच वाड्या वस्त्यावर सांगोला नगरपालिकेच्या हद्दीत नगरपालिकेच्या वतीने मूलभूत सोयी-सुविधा पुरविल्या जातात त्यात महत्त्वाचे म्हणजे पाणीपुरवठा यासह सांडपाणी वाहून नेण्यासाठीच्या गटारी, रस्ते, लाईट या मूलभूत सुविधा देण्यासाठी सांगोला नगरपालिकेकडून कोट्यावधी रुपये घरपट्टी आणि पाणीपट्टी च्या स्वरूपात कर आकारणी देखील केली जाते आणि या दोन्ही कराची रक्कम नागरिकांकडून सक्तीने वसुल देखील केली जाते हा जरी प्रशासकीय यंत्रणेचा भाग असला तरी ज्या प्रकारे तत्परतेने कर आकारणी केली जाते तीच तत्परता शहरातील नागरिकांना मूलभूत सुविधा पुरवत असताना दाखविणे गरजेचे आहे मात्र तसे होताना दिसत नाही. त्याचेच एक  उदाहरण म्हणजे सांगोला नगरपालिकेमार्फत भली मोठ्ठी रक्कम खर्च करून एखतपुर रोड येथे भाजी मंडई बांधण्यात आली आहे मात्र या भाजी मंडईची इमारत पूर्णतः तयार होऊन देखील अद्याप धुळखातच पडलेल्या अवस्थेत आहे ही भाजी मंडई मस्के कॉलनी, शिक्षक कॉलनी, यासह ड्रीम सिटी येथील रहिवासी यांच्यासह अन्य एखतपुर रोड, चिंचोली रोड, महूद रोड येथील परिसरातील रहिवाशांसाठी सोयीची व्हावी म्हणून बांधण्यात आली आहे.
   शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असणारी जुनी भाजी मंडई ही खूप दूर अंतरावर असल्यामुळे पर्यायी म्हणून या परिसरातील रहिवाशांना सोयीसाठी ही भाजी मंडई नगरपालिकेकडून मंजूर करण्यात आली व त्या भाजी मंडईची इमारत बांधून तयार असून देखील ती इमारत अनेक दिवसांपासून धुळखात पडण्याचे कारण कदाचित सांगोला नगरपालिकेवरील प्रशासकीय राजवटच असावी की काय ? असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे कारण सांगोला नगरपालिकेमध्ये नगरसेवक आणि नगराध्यक्ष हे पद रिक्त असल्यामुळे नागरिकांनी आपली व्यथा मांडायची कोणाकडे हे प्रश्न अनुत्तरीतच असल्याने प्रशासनासमोर नागरिकांची बाजू मांडणार तरी कोण ? असा देखील प्रश्न या परिसरातील शहरवासीयांना पडत आहे नगरपालिकेचे एकतर्फी कारभारी असणाऱ्या प्रशासक यांनीच आता लक्ष घालून या इमारतीमध्ये लवकरात लवकर भाजी मंडई सुरू करावी अशी मागणी व्यक्त होत आहे.
नगरपालिकेतील प्रशासक राजवटीमुळे शहरात सोयी- सुविधांचा अभाव.!
शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असणारी जूनी भाजी मंडई शहराच्या हद्दवाढ भागातील नागरिकांसाठी दूर अंतरावर पडत असल्याने एखतपुर रोड येथे परिसरातील नागरिकांच्या सुविधासाठी नगरपालिकेमार्फत भाजी मंडई बांधण्यात आली आहे नगरपालिकेत प्रशासक यांच्या दुर्लक्ष मुळे व  पालिकेत लोकप्रतिनिधी नसल्यामुळे भाजी मंडईची ही इमारत बांधून तयार होऊन देखील गेली अनेक दिवस धुळखात पडली आहे नगरपालिकेतील प्रशासक यांनी आता लक्ष घालून या नूतन इमारतीमध्ये भाजी मंडई सुरू करावी अशी मागणी या परिसरातील शहरवासीय करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!