सांगोला तालुकाक्रीडामहाराष्ट्रशैक्षणिक

सांगोला विद्यामंदिरच्या आरती बाबरची राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेसाठी निवड

सांगोला ( प्रतिनिधी ) 32 वी राज्यस्तरीय ज्युनिअर तायक्वांदो  स्पर्धा स्वर्गीय मीनाताई ठाकरे विभागीय क्रीडा संकुल हिरावाडी पंचवटी नाशिक येथे दि.२७ जानेवारी ते ३० जानेवारी २०२४ या कालावधीत पार पडली .या स्पर्धेमध्ये सांगोला विद्यामंदिर ज्युनिअर कॉलेजची आरती  बाबर हिने ५९ किलो खालील वजन गटात गोल्ड मिडल मिळविले.व तिची जयपूर राजस्थान येथे  होणाऱ्या राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेसाठी निवड झाली.
यशस्वी खेळाडूला क्रीडा विभाग प्रमुख ज्युनिअर कॉलेज प्रा. डी.के पाटील,नरेंद्र होनराव, सुभाष निंबाळकर, प्रा.संतोष लवटे. यांचे मार्गदर्शन लाभले.
  यशस्वी खेळाडूचा  प्राचार्य गंगाधर घोंगडे व उपप्राचार्य शहिदा सय्यद यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी पालक व प्रा.डी.के.पाटील उपस्थित होते.
 या यशस्वी खेळाडूचे व मार्गदर्शक शिक्षकांचे सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला अध्यक्ष प्रा.प्रबुद्धचंद्र झपके, सचिव मल्लिकार्जुन घोंगडे,खजिनदार शंकरराव सावंत,सहसचिव प्रशुद्धचंद्र झपके,संस्था कार्यकारिणी सदस्य विश्वेश झपके, सर्व संस्था सदस्य,  उपमुख्याध्यापक लक्ष्मण विधाते,पर्यवेक्षक अजय बारबोले, पोपट केदार, बिभीषण माने, सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!