सांगोला महाविद्यालयातील वाणिज्य विभागातील प्राध्यापक, विद्यार्थ्यांची श्री गणेश बेकरी प्रा लि. नांदणी येथे क्षेत्रीय भेट
सांगोला:प्रतिनिधी : सांगोला महाविद्यालयातील वाणिज्य विभागातील बीकॉम भाग 2 व 3 मधील 45 विद्यार्थ्यांनी दिनांक 25 फेब्रुवारी 2024 रोजी नांदणी येथील श्री गणेश बेकरी प्रा. लि. ता. शिरोळ जि. कोल्हापूर येथे क्षत्रिय भेट दिली.
भेटीदरम्यान व्यवस्थापकांनी बेकरी बद्दल आणि बेकरीमध्ये तयार होणाऱ्या सर्व उत्पादनाबद्दल सविस्तर माहिती सांगितली. त्यामुळे कच्च्या मालापासून पक्क्या मालापर्यंतची प्रत्यक्ष उत्पादन प्रक्रिया कशी चालते याची सर्व प्रक्रिया विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली तसेच उत्पादन प्रक्रिया पाहून झाल्यानंतर व्यवस्थापकाने विद्यार्थी प्राध्यापकांना उद्योजक श्री. आण्णासो चाकोते यांचा सायकल वरून पाव विकण्याचा ऑडी कार खरेदी पर्यंतचा प्रवास दृकश्राव्याच्या माध्यमातून दाखवला. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये उद्योजक बनण्याची प्रेरणा निर्माण झाली. श्री. प्रसाद जाधव याने विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून आभार व्यक्त केले.
सदरच्या औद्योगिक क्षत्रिय भेटीस महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.सुरेश भोसले, कार्यालयीन अधीक्षक श्री प्रकाश शिंदे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. विद्या जाधव, प्रा. सचिन सुरवसे, प्रा. समाधान माने, प्रा. प्राप्ती लामगुंडे व टॅली प्रशिक्षक श्री. महाडिक सर या सर्वांनी या भेटीसाठी विशेष परिश्रम घेतले.