शिवणे माध्यमिक विद्यालयाचे ग्रंथपाल रघुनाथ सोसे यांना सेवानिवृत्ती निमित्त सदिच्छा

शिवणे वार्ताहर- शिवणे माध्यमिक विद्यालय शिवणे चे ग्रंथपाल श्री रघुनाथ यशवंत सोसे नियत वयोमानानुसार सेवा निवृत्त झाले असून त्याबद्दल त्यांच्या निरोपाचा सदिच्छा समारंभ नुकताच विद्यालयाच्या प्रांगणात पार पडला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्था अध्यक्ष बबनराव जानकर हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्था उपाध्यक्ष प्रकाशभाऊ वाघमोडे व संस्था सदस्य धनंजय घाडगे हे होते.
कार्यक्रमाच्या सुरवातीला मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. त्यानंतर सत्कारमूर्ती रघुनाथ सोसे यांचा सपत्नीक फेटा बांधून मायेची शाल,विठ्ठलरुक्मिणीची मूर्ती, आणि पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला.
आपल्या मनोगतातून प्रा.कामदेव खरात, मीरा देशमुख मॅडम,मारुती सिद यांनी सोसे सर यांनी आपल्या सेवा कालावधीत केलेल्या कामगिरीचा आढावा घेतला.आपल्या भाषणात प्राचार्य विजयकुमार वाघमोडे म्हणाले की, आपल्या सेवा काळात पूर्णवेळ शाळेसाठी देणारा व्यक्ती म्हणजे सोसे सर आहेत त्यांना त्यांच्या भविष्यासाठी आरोग्यदायी शुभेच्छा दिल्या.
आपल्या सत्काराला उत्तर देताना रघुनाथ सोसे सर यांनी प्रशालेचा सर्व स्टाफ,आणि संस्थेचे आभार व्यक्त करून त्यांच्या ऋणात कायम राहण्याची अपेक्षा व्यक्त केली.
आपल्या अध्यक्षीय मनोगतातून त्यागी वृत्ती जोपासून एक विश्वासू साथीदार म्हणून इतरांचे नेहमी चांगले व्हावे हीच भवना मनामध्ये ठेवणारे व्यक्तिमत्व म्हणजे रघुनाथ सोसे आहेत अशी भावना व्यक्त केली.
सदर कार्यक्रम प्रसंगी अशोक जानकर, काशीलिंग शेळके सर,जिजाबाई इरकर,अंजना बाळू जानकर, शंकर जानकर, चंद्रकांत जानकर गुरुजी ,तानाजी नलवडे या सर्वांनी सहकुटुंब सोसे सर यांचा सपत्नीक कपड्यांचा आहेर देऊन सत्कार केला.
सदर कार्यक्रमास शंकर जानकर, तानाजी नलवडे, विठ्ठल पिसे, या मान्यवरांच्या बरोबर बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.राजाभाऊ कोळवले यांनी केले तर आभार प्रा.शोभनतारा मेटकरी यांनी मानले.