नाझरा :- फिनिक्स प्री प्रायमरी स्कूल नाझरा मध्ये भारताचा ७८वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
प्रथम फिनिक्स प्री प्रायमरी स्कूल नाझरेच्या संस्थापक सौ डॉ. ऐश्वर्या सोनवणे मॅडम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले, त्यानंतर उपस्थित फिनिक्स प्री प्रायमरी स्कूलच्या प्रिन्सिपल सोनाली सरगर मॅडम, तसेच एकलव्य कोचिंग क्लासेस चे संस्थापक डॉ. श्री कन्हैया सोनवणे सर तसेच पालक वर्ग श्री. रविराज गुरव, श्री.सतीश चौगुले, श्री सचिन शिंदे, श्री पृथ्वीराज परदेशी, श्री भागाप्पा बंडगर, श्री सचिन गुरव, सौ , माने, सौ चौधरी, व भुशारी इत्यादी विद्यार्थी व पालक वर्ग यांच्या उपस्थितीत राष्ट्रगीत, ध्वजगीत, राज्य गीत घेण्यात आले .
यावेळी सर्व पालकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ आलदर मॅडम यांनी केले तसेच फिनिक्स प्री प्रायमरी स्कूल च्या मुलांनी देश रंगीला रंगीला, नन्ना मुन्ना राही हो, फिर भी दिल है हिंदुस्तानी या देशभक्तीपर गाण्यावर नृत्य सादर केले.
हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी सौ सोनाली सरगर मॅडम, सौ काजल आलदर मॅडम व शुभांगी रायपुरे यांनी विशेष परिश्रम घेतले.