आलेगाव येथे डी.एड व बी.एड प्रशिक्षणार्थीचा छात्रसेवा काल सुरू

सांगोला (प्रतिनिधी):- डॉ. बाबासाहेब आंबेडकर खादी ग्रामोद्योग संघ ,मंगळवेढा संचलित .श्रीमती गीता बनकर महिला शिक्षणशास्त्र महाविद्यालय सांगोला व डी.एड प्रशिक्षणार्थींचे 10 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी 2025 दरम्यान श्री.अशोकराव देसाई कृषी विद्यालय, आलेगाव येथे छात्रसेवा काल आयोजित केला आहे.
सोमवार दि.10 फेब्रुवारी 2025 रोजी डी.एड व बी.एड प्रशिक्षणार्थींचा स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे अध्यक्ष पद लवटे सर यांनी भूषविले. तर प्रमुख पाहुणे काशीद सर उपस्थित होते. यावेळी जाधव सर व प्रशालेतील शिक्षक डी एड व बी एड प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.यांनी उपस्थित प्रशिक्षणार्थींना मोलाचे मार्गदर्शन केले व शुभेच्छा दिल्या.
यावेळी श्रीमती गीता बनकर महिला शिक्षणशास्त्र महाविद्यालय सांगोलाचे प्राचार्य गरांडे सर व बीएड विभागप्रमुख गयाळी मॅडम यांनी’ गरुडझेप कुल ‘गटाचे काम पाहिले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बीएड प्रशिक्षणार्थी अनुजा खंडागळे मॅडम यांनी केले तर प्रास्ताविक संजय सांगोलकर सर यांनी तर आभार प्रदर्शन अभिजीत कांबळे सर यांनी केली. या कार्यक्रमासाठी मोलाचे मार्गदर्शन प्राचार्य गरांडे सर व प्रा.गयाळी मॅडम यांनी केले. यावेळी छात्र मुख्याध्यापक म्हणून लगस मॅडम व छात्र उपमुख्याध्यापक म्हणून खंडागळे मॅडम, पर्यवेक्षिका म्हणून कुमारी म्हेत्रे मॅडम यांनी लिपिक म्हणून उमरदंड मॅडम म्हणून काम पाहिले असल्याची माहिती प्रसिद्धी विभाग प्रमुख तुषार कुंभार सर यांनी दिली.



