*लायन्स आय कॅम्पमधून आलेगाव येथील रुग्णांची यशस्वी मोतीबिंदू शस्त्रक्रिया*

सांगोला (प्रतिनिधी) लायन्स क्लब ऑफ सांगोला आयोजित गुणाई सुमन डेअरी आलेगाव व श्रीमंत विजयसिंहराजे पटवर्धन लायन्स आय हॉस्पिटल सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने माजी प्रांतपाल ला.प्रा.प्रबुद्धचंद्र झपके यांचे मार्गदर्शनाखाली समाजसेवक, सांगोला लायन्स क्लबचे प्रथम उपाध्यक्ष ला.इजि.हरिदास कांबळे यांच्या वाढदिवसानिमित्त आलेगाव येथे संपन्न झालेल्या मोफत नेत्र तपासणी व अल्प दरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरामधील १८ रूग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रिया करणे आवश्यक होते.त्यापैकी पहिल्या टप्प्यात ५ रूग्णांची मातीबिंदू शस्त्रक्रिया यशस्वीपणे झाली.
दि.१० मार्च २०२४ रोजी आलेगाव गावातील आणि परिसरातील एकूण १०० पेक्षा जास्त रुग्णांची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली.त्यापैकी १८ रूग्णांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया करणे आवश्यक होते. त्यापैकी पहिल्या टप्प्यात ५ रग्णांची सांगली आय हॉस्पिटलमध्ये अल्पदरात यशस्वी मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली.काल दि.१३ मार्च २०२४ रोजी सांगली आय हॉस्पिटल रुग्णवाहिकेतून सर्व यशस्वी मोतीबिंदू शस्त्रक्रिया करून आलेगाव येथे पोहोचले.
यावेळी समाजसेवक इंजि. ला. हरिदास कांबळे व गुणाई सुमन डेअरीच्या चेअरमन सौ. सुमन कांबळे यांनी सर्वांचा सत्कार केला यावेळी उपसरपंच राहुल ढोले व गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. अशी माहिती सांगोला लायन्स क्लब अध्यक्ष ला.उन्मेश आटपाडीकर,सचिव अजिंक्य झपके, खजिनदार ला.नरेंद्र होनराव यांनी दिली.