सांगोला केंद्राची माहे डिसेंबरची शिक्षण परिषद संपन्न

सांगोला दि.29 :–सांगोला केंद्र ता.सांगोलाची माहे डिसेंबरमधील शिक्षण परिषद सह्याद्री इंग्लिश मीडियम स्कूल सांगोलामध्ये दि.26 डिसेंबर रोजी संपन्न झाली.प्रमुख पाहुण्या म्हणून सौ.अनिता इंगवले,व्यवस्थापक सह्याद्री स्कूल या होत्या तर अध्यक्षस्थानी केंद्रप्रमुख अस्लम इनामदार साहेब होते.
प्रास्ताविक कैलास व्होवाळ यांनी केले.रंगोत्सव या उपक्रमाबाबत त्यांनी संपूर्ण माहिती दिली. हॅकेथान स्पर्धा व चॅटबोट अपवर परीक्षेचे गुण भरणे.तसेच इतर माहिती शहनाज अत्तार यांनी दिली. बेहरे चिंचोली शाळेचे मुख्याध्यापक विष्णु राऊत यांनी निपुण भारत अंतर्गत माता व बालक यांचे व्हाटस अप ग्रुप तयार करून त्याची प्रभावी अंमलबजावणी कशी करावी? याबाबत सविस्तर माहिती दिली.शैक्षणिक सहल,शिष्यवृत्ती व इतर 26 प्रकारचे प्रशासकीय विषय अस्लम इनामदार यांनी विषद केले. यावेळी सर्व शाळांचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक उपस्थित होते. खेळीमेळीच्या वातावरणात परिषद संपन्न झाली.अत्तार मॅडमनी आभार मानले.