क्रांतीज्योती महिला नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक श्री.रामचंद्र अण्णा बनकर यांच्या वाढदिवसानिमित्त बनकरवाडी शाळेत वृक्षारोपण

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बनकरवाडी येथे शिक्षण सप्ताह अंतर्गत सहाव्या दिवशी इको क्लब ची स्थापना करून त्या अंतर्गत क्रांतीज्योती महिला नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक श्री .रामचंद्र अण्णा बनकर यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना पन्नास वृक्षांचे वाटप करण्यात आले.काही रोपे शाळेत ही लावण्यात आली.
सदर वृक्षारोपण मध्ये जंगली लिंब आणि कन्हेर ही झाडे मुलांना जोपासना करण्यासाठी देण्यात आली. रोपे दिलेल्या विद्यार्थ्यांचा वेगळा व्हाट्सअप ग्रुप करून सदर रोपांची जोपासना व त्याची वाढ होताना चे फोटो नेहमी शेअर करून वृक्षारोपणाचा हा उपक्रम पूर्णपणे यशस्वी होईल असा प्रयत्न शिक्षक वृंद यांनी केला आहे.

सदर कार्यक्रमासाठी शाळेचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व उद्योजक श्री.रमेश संभाजी बनकर तसेच पतसंस्थेचे व्यवस्थापक श्री गणेश नारायण अनंतकवळी( माळी) श्री.अभिजीत बनकर ,श्री. खंडू रंगनाथ बनकर व शाळेतील सर्व शिक्षक उपस्थित होते.