माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठान संचलित बालवाडी शिक्षिका प्रशिक्षण; वर्गाचा निकाल 100%

माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठान संचलित कौशल्य विकसन केंद्र येथे सुरु असलेल्या बालवाडी शिक्षिका
प्रशिक्षण वर्गाच्या परिक्षेचा निकाल 100%. लागला.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ सोलापूर मान्यता प्राप्त बालवाडी शिक्षिका प्रशिक्षण वर्ग गेले
सहा महिने सुरु होता . नऊ मुलींनी हा प्रशिक्षण वर्ग पूर्ण केला. यामध्ये कार्यपद्धती, सिद्धांत उदिष्टे,
बालकल्याण, आरोग्य आहार, बालमानसशास्त्र, हस्तकला असे विषय शिकविण्यात आले.
या साठी मार्गदर्शक म्हणून संस्थेच्या कोषाध्यक्षा डॉ. शालिनी कुलकर्णी, कौशल्य विभाग प्रमुख सौ. वसुंधरा
कुलकर्णी यांचे मार्गदर्शन लाभले.
तसेच उत्कर्ष विद्यालयाच्या माजी मुख्याध्यापिका मा. संजीवनी भोसेकर, मा. विजया खडतरे, मा. सुशीला
नांगरे, तसेच माजी शिक्षिका मा. सुधामती लोंढे , मंगल लाटणे यांचेही वर्गासाठी मार्गदर्शन लाभले
तसेच विषय शिक्षिका म्हणून सौ. सुनीता कुलकर्णी, मधुरा शास्त्री, स्वप्ना कुलकर्णी, शालन गयाळी, धनश्री
सोनंदकर, विद्या म्हेत्रे यांनी विषय शिकविले. तसेच या वर्गात सौ.शकीला काझी यांनी 92 % मिळवून
विद्यापीठात प्रथम येण्याचा मान मिळविला.

नितल गायकवाड 86 % , आश्लेषा पाटील 84 %, शितल क्षीरसागर 81%, सरस्वती सुतार 80 %, ऐश्वर्या
पवार 80 %, शुभांगी कांबळे 72 %, स्वाती पवार 72 %, रेणूका महामुनी 70 % यांनी या परिक्षेत यश
प्राप्त केले. त्यांच्या या यशासाठी संस्था अध्यक्षा मा. संजीवनी केळकर तसेच संस्थेच्या सर्व पदाधिकारी
यांनी मुलींचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. उत्तीर्ण विद्यार्थिनी पैकी दोन
विद्यार्थिनींना नोकरी मिळाली आहे.

पु. अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा दुसरा बालवाडी प्रशिक्षण वर्ग सुरु झाला असून तिसरी
बॅच मे 2024 पासून सुरु होणार असून यासाठी केळकर हॉस्पिटल समोरील संस्था कार्यालयात जाऊन
विद्यार्थिनीनी प्रवेश घ्यावा असे आवाहन अध्यक्षा डॉ.संजीवनी केळकर यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button