सांगोला विद्यामंदिरमध्ये इ.१२ वी व स्पर्धा परीक्षा गुणवंताचा सत्कार संपन्न

सांगोला -(प्रतिनिधी) सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला संचलित सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेज सांगोला फेब्रु.२०२५ मध्ये घेण्यात आलेल्या एच.एस.सी बोर्ड परीक्षेमधील शास्त्र,कला व वाणिज्य शाखेतील प्रथम तीन क्रमांकाचे व एम.एच.टी.सी.ई.टी व नीट परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा पालकांसमवेत संस्थाध्यक्ष प्रा.प्रबुद्धचंद्र झपके यांचे हस्ते व संस्था सचिव मल्लिकार्जुन घोंगडे, प्राचार्य अमोल गायकवाड, उपमुख्याध्यापका शहिदा सय्यद, उपप्राचार्य प्रकाश म्हमाणे, पर्यवेक्षक प्रदीप धुकटे, उत्तम सरगर,काकासो नरूटे यांचे उपस्थितीत सत्कार करण्यात आला.
सुरुवातीला संस्थापक अध्यक्ष गुरूवर्य चं.वि.तथा बापूसाहेब झपके यांचे तैलचित्रास गुणवंत विद्यार्थी व पालक यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
त्यांनंतर गुणवंत विद्यार्थ्यांचा मेडल, गुलाब पुष्प व १००० रुपये रोख रक्कम बक्षीस देऊन पालकांसमवेत सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थाध्यक्ष प्रा.प्रबुद्धचंद्र झपके यांनी बारावीचे वर्ष विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे आहे.यश मिळविण्यासाठी सुरुवातीपासून अभ्यास करावा.तसेच सुयोग्य नियोजन, परिश्रम घेतल्यास यश निश्चित मिळेल असे सांगत यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.पालक व गुणवंत विद्यार्थ्यांनी मनोगतामध्ये विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेज शिस्त, गुणवत्ता,व अध्यापकांच्या अध्यापनाविषयी गौरवउद्गार काढले.यावेळी ज्युनिअर कॉलेजमधील सर्व मार्गदर्शक विषय शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांचा गुलाब पुष्प व उपप्राचार्य प्रकाश म्हमाणे यांचे वतीने देण्यात आलेली भेट वस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेजमधील शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी, पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते
कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य प्रकाश म्हमाणे यांनी केले.सूत्रसंचालन प्रा.प्रसाद खडतरे, प्रा.राजेंद्र कुंभार यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा.निलेश नागणे यांनी केले.



