श्री.वैजिनाथ घोंगडे याना वसंतराव नाईक जलसंधारण राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान*
मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे व कृषीमंत्री मा. धनंजय मुंडे यांचे हस्ते पुरस्काराचे वितरण

स्व. वसंतराव नाईक कृषी संशोधन व ग्रामीण विकास प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी देण्यात येणारा राज्यस्तरीय वसंतराव नाईक जलसंधारण पुरस्कार वाढेगाव येथील श्री.वैजीनाथ घोंगडे यांना प्रदान करण्यात आला. .
माणगंगा भ्रमणसेवा संस्थेचे अध्यक्ष वैजिनाथ घोंगडे यांनी गेल्या दहा वर्षापासून माणगंगा संस्थेच्या वतीने सोलापूर, सांगली जिल्ह्यातील माणगंगा नदीवर केलेल्या कामाची नोंद घेऊन त्यांना जलसंधारण पुरस्कार जाहीर झाला होता. महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या १११ व्या जन्मदिनानिमित्त सोमवार दि. १ जुलै रोजी सायं. ५ वा. मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे, कृषी मंत्री मा.धनंजय मुंडे यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले.
यावेळी राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल,आमदार निलय नाईक, आमदार राजेश राठोड,आमदार इंद्रनील नाईक, राहुरी येथील जोतीराव फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील, प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र बारवाले, सचिव दिपक पाटील,विश्वस्त डॉ.आनंद पटवर्धन,मुश्ताक अंतुले, बृहत भारत संस्थेचे श्रीहर्ष फेणे आदि उपस्थित होते शाल, श्रीफळ, स्मृतीचिन्ह व रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरूप असून सदर कार्यक्रम यशवंतराव चव्हाण सभागृह,मुंबई या ठिकाणी पार पडला. राज्यातील दर वर्षी दिला जाणारा हा सन्मानाचा पुरस्कार असून पुरस्कार जाहीर झालेबद्दल अनेक संस्था, व्यक्तींनी वैजिनाथ घोंगडे यांचे अभिनंदन केले.
या पुरस्कार सोहळ्यासाठी उद्योगपती सुदाम भोरे,सदाफुले मामा, माणगंगा परिवाराचे सचिन इंगोले,बाळासाहेब सावंत, दत्ता पाटील, प्रा. राजेंद्र सुर्यवंशी, विठ्ठल मल्टिस्टेटचे चेअरमन दिपक बंदरे,दिपक दिघे,नितीन जाधव, शिवाजी दिघे, राहुल घोंगडे, श्रीकृष्ण माने यांनी आवर्जून उपस्थिती दर्शवली.
कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या भाषणातून 75कि.मी नदीपात्र व 28 बंधारे लोकसहभागातून स्वच्छ केल्याचा उल्लेख केला तसेच शेतकरयांसाठी पाण्याची व्यवस्था केली याबद्दल वैजीनाथ घोंगडे व माणगंगा भ्रमण सेवा संस्थेच्या कामाचे विशेष कौतुक केले.*
माजी मुख्यमंत्री स्व.वसंतराव नाईक यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांच्या नावाने दिला जाणारा जलसंधारण पुरस्कार हा माझ्यासाठी नक्कीच अभिमानास्पद आहे. त्यामुळे मला भविष्यात जोमाने काम करण्यासाठी आणखी बळ मिळाले आहे.*
*तसेच हा पुरस्कार माझा एकट्याचा नसून माझ्यासमवेत काम करणारे माणगंगा भ्रमणसेवा संस्थेचे सर्व सदस्य व ज्यांनी ज्यांनी या कामात मला सहकार्य केले त्या सर्वांचा आहे. असे वैजीनाथ घोंगडे यांनी सांगितले.*