सांगोला विद्यामंदिर प्राथमिक विद्यालयाची इयत्ता तिसरीची क्षेत्रभेट उत्साही वातावरणात संपन्न
कामसिद्ध मंदिर आणि विजय इमडे यांच्या जर्सी गायीचा मुक्त गोठा पाहून विदयार्थी गेले भारावून

सांगोला (प्रतिनिधी) सांगोला विद्यामंदिर प्राथमिक विद्यालयातील इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्यांची क्षेत्रभेट कामसिद्ध मंदिर इमडेवाडी सावे येथे उत्साही वातावरणात संपन्न झाली. या क्षेत्रभेटीत निसर्गरम्य परिसरात असलेल्या कामसिध्द देवाचे दर्शन घेवून विविध खेळाचा आनंद लुटला. तर प्रसिध्द गोपालक विजय इमडे यांच्या मुक्त जर्सी गायींच्या गोठ्याला भेट दिली. यावेळी हर्षद इमडे यांनी मुक्त जर्सी गायींच्या गोठ्याची संकल्पना समजावून सांगून या उद्योगाविषयी संपूर्ण माहिती दिली. जर्सी गायींच्या विविध प्रजाती विद्यार्थ्यानी पाहून हर्षद इमडे यांना काही प्रश्न विचारले यावेळी इमडे यांनी सविस्तर माहिती दिली. यावेळी विद्यालयाचे प्र.मुख्याध्यापक उदय बोत्रे यांनी हर्षद इमडे यांचा सत्कार केला.
कामसिद्ध मंदिरात विद्यार्थ्यानी विविध खेळाचा अनुभव घेतला. यावेळी प्राथमिक शिक्षक सुभाष भडंगे यांनी विविध गाणी संगीताच्या तालावर म्हणून दाखविली. यावेळी त्यांना तबल्याची साथ संगत विद्यालयाचे प्र.मुख्याध्यापक उदय बोत्रे यांनी तर टाळाची साथ संगत कोवाळे सर यांनी दिली. विद्यालयातील विद्यार्थी शिवराज शिंदे याने अंगावर शहारा आणणारा पोवाडा गायिला.
सदर क्षेत्रभेट उत्साही वातावरणात पार पाडण्यासाठी विद्यालयाचे प्र.मुख्याध्यापक उदय बोत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली क्षेत्रभेट प्रमुख जगन्नाथ साठे, सहशिक्षक शशिल ढोले पाटील, चेतन कोवाळे, धोंडीराम चव्हाण व सहशिक्षिका स्नेहलता बाबर, वैशाली पाटील, शिक्षकेतर कर्मचारी प्रथमेश निंबाळकर व उज्वला माळी आदींनी परिश्रम घेतले.
————————————–
सदर क्षेत्रभेट प्रसंगी प्रसिध्द उद्योगपती शाहू राजे मेटकरी व उमेश पाटील यांनी विद्यार्थ्याना अल्पोपहार दिला त्याबद्दल तसेच कामसिध्द मंदिराचे पुजारी यांनी मंदिर उपलब्ध करून दिल्याबद्दल विद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
————————————–