सांगोला महाविद्यालयाचा विद्यार्थी श्री.निलेश इंगळे यांची उपशिक्षणाधिकारी पदी निवड

सांगोला/ प्रतिनिधी: राज्य लोकसेवा आयोगामार्फत 2022 मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. या परीक्षेमध्ये सांगोला महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी श्री.निलेश विठ्ठल इंगळे (कडलास, ता सांगोला) यांची उपशिक्षणाधिकारी पदी निवड झाली आहे. विविध क्षेत्रातील मान्यवरांचे कडून त्यांचे अभिनंदन होत आहे.
सांगोला महाविद्यालयामध्ये त्याने सन. 2017 ते 2021 मध्ये रसायनशास्त्र विषयातून पदवी प्राप्त केली आहे. सध्या तो वस्तू व सेवा कर भवन, पुणे येथे राज्य्कर निरीक्षक म्हणून कार्यरत आहे. सांगोला तालुका उच्च शिक्षण मंडळाचे अध्यक्ष मा. श्री. बाबुरावजी गायकवाड, उपाध्यक्ष श्री. तात्यासाहेब केदार, उपाध्यक्ष प्रा.पी.सी. झ्पके, सचिव म.सि.झिरपे सर सर्व संस्था पदाधिकारी, प्रभारी प्राचार्य, डॉ सुरेश भोसले, विभाग प्रमुख डॉ. पी.एस.पाटील, प्रा.डॉ. भारत पवार व विभागातील सहकारी प्राध्यापक यांचे सह प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व कार्यालयीन अधिक्षक श्री. पी. एस. शिंदे यांनी त्यांचे अभिनंदन केले.