सांगोला तालुकामहाराष्ट्र

माण नदी नांगरणी उपक्रमास आपुलकी प्रतिष्ठानकडून १० हजार रुपयांची मदत

सांगोला ( प्रतिनिधी )- माण नदी पात्राच्या नांगरणी उपक्रमास सांगोला येथील आपुलकी प्रतिष्ठानकडून १० हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली.

माण नदीच्या पात्राची नांगरणी चार ट्रॅक्टर मार्फत गुरुवारी आपुलकी प्रतिष्ठान सदस्यांच्या उपस्थितीत सुरु करण्यात आली. यावेळी माणगंगा भ्रमणसेवा संस्थेचे अध्यक्ष वैजिनाथ घोंगडे यांच्याकडे १० हजार रुपये मदतीचा धनादेश सुपूर्द करण्यात आला.

पावसाचे पडणारे पाणी माण नदीपात्रातून जमिनीत मुरावे, पर्क्युलेशन वाढून आसपासच्या विहिरी-बोअरला पाणी वाढावे या उद्देशाने माणगंगा भ्रमणसेवा बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने प्रायोगिक तत्त्वावर काही ठिकाणचे माण नदीपात्र नांगरणे किंवा मोठ्या ट्रॅक्टरने फणकाटी मारण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. स्तुत्य अशा या नाविन्यपूर्ण उपक्रमाला प्रोत्साहन देण्यासाठी थोडीशी आर्थिक मदत आपुलकी प्रतिष्ठान सांगोला या संस्थेकडून देण्यात आली.

यावेळी आपुलकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र यादव, सचिव संतोष महिमकर, अरविंद केदार, सुरेशकाका चौगुले, संभाजी पाटील, अरविंद डोंबे, सुनिल मारडे, प्रा. डॉ. विजय जाधव आदिसह वाढेगाव येथील नागरिक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!