शैक्षणिकसांगोला तालुका

सांगोला विद्यामंदिरमध्ये शै.वर्ष सन २०२३-२४ मध्ये विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत.

सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्यू .कॉलेज सांगोला येथे शैक्षणिक वर्ष सन २०२३-२४ मध्ये १५ जून २०२३ रोजी शाळेच्या पहिल्या दिवशी इयत्ता ५ वी ते १२ वी मधील वर्गातील विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.यामध्ये इयत्ता ९ वी ते १२ वी या विद्यार्थ्यांचे स्वागत सकाळ सत्रामध्ये करण्यात आले. व ५ वी ते ८ वी मधील विद्यार्थ्यांचे स्वागत दुपार सत्रामध्ये करण्यात आले. सदर स्वागत समारंभ प्राचार्य गंगाधर घोंगडे , उपमुख्याध्यापक लक्ष्मण विधाते, उपप्राचार्य शाहिदा सय्यद, पर्यवेक्षक अजय बारबोले, बिभिषण माने, पोपट केदार , शिक्षक- शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात गुलाब पुष्प देऊन संपन्न झाला.
सुरुवातीला विद्येची देवता सरस्वती पूजन व संस्थापक अध्यक्ष गुरुवर्य चं.वि. तथा बापूसाहेब झपके यांच्या प्रतिमेस संस्था सचिव म.शं. घोंगडे यांच्या हस्ते पुष्पहार समर्पित करण्यात आला.
यावेळी सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेज मधील शिक्षक- शिक्षकेत्तर कर्मचारी , विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चौकट शाळेच्या पहिल्या दिवशी सांगोला विद्यामंदिर प्रशालेमध्ये इयत्ता ६ वी ते ८ वी च्या विद्यार्थ्यांना संस्था सचिव म.शं.घोंगडे यांचे हस्ते मोफत पुस्तक वाटप करण्यात यावेळी प्राचार्य गंगाधर घोंगडे ,उपमुख्याध्यापक लक्ष्मण विधाते ,पर्यवेक्षक पोपट केदार ,ग्रंथपाल किरण घोंगडे, देशमुख मॅडम व बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!