फॅबटेक इंजिनिअरिंग मध्ये प्रथम वर्ष व थेट व्दितीय वर्ष प्रवेश प्रक्रिया मोफत मार्गदर्शन केंद्र

सांगोला :- शैक्षणिक वर्ष २०२४-२५ इंजिनिअरिंग प्रवेशासाठी फॅबटेक टेक्नीकल कॅम्पस कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अॅण्ड रिसर्च, सांगोला येथे शासनमान्य प्रथम वर्ष व थेट व्दितीय वर्ष प्रवेश प्रक्रिया सुविधा केंद्र आहे. या सुविधा केंद्रामार्फत इंजिनिअरिंग प्रवेशासाठी नोंदणी प्रक्रिया लवकरच सुरु होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर महाविद्यालयामध्ये प्रथम वर्ष व थेट व्दितीय वर्ष प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन केंद्र सुरु करण्यात आले असल्याची माहिती प्राचार्य डॉ. रवींद्र शेंडगे यांनी दिली.
या मार्गदर्शन केंद्रामध्ये विद्यार्थ्यांना प्रथम वर्ष व थेट व्दितीय वर्षासाठी आवश्यक असणारी महत्त्वाचे कागदपत्रे तसेच ऑनलाईन ऍडमिशन फॉर्म भरणे, फॉर्मची पडताळणी करणे आणि फॉर्म कायम करणे या संदर्भात सर्व माहिती देण्यात येणार आहे.
महाविद्यालयामध्ये सिव्हील इंजिनिअरिंग, कॉम्पुटर सायन्स इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, व ए.आय. अॅण्ड डेटा सायन्स या शाखा उपलब्ध आहेत . या शाखेचा अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना सर्वच क्षेत्रात आता सद्यस्थितीत व भविष्यात मोठ्या संख्येने नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध आहे . त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या मार्गदर्शन केंद्राला भेट द्यावी तसेच अधिक माहितीसाठी ८४०८८८८६५७ / ८४०८८८८५०४ या नंबर शी संपर्क साधण्याचे आवाहन अॅडमिशन समन्वय प्रा.राजकुमार गावडे यांनी केले आहे.