सांगोला तालुकाक्राईम

*प्रवासा दरम्यान ३ लाख ९५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास…*

सांगोला (प्रतिनिधि ) नातूच्या नामकरण सोहळ्यासाठी भावाकडे एसटी बसमधून जाताना अज्ञात इसमाने प्रवासी महिलेच्या पर्समधून १२ तोळे सोन्याचे दागिने तसेच ५ हजार रुपयेच्या मोबाईलसह रोख १० हजार रुपये असा एकूण सुमारे ३ लाख ९५ हजार रुपये किमतीचा ऐवज लंपास केला असल्याची घटना शुक्रवार दि.३ मे रोजी दुपारी अडीच ते साडेपाच वा .च्या प्रवासादरम्यान सोलापूर ते आटपाडी जाताना महूद ता. सांगोला येथे उघडकीस आली. याबाबत , सुनंदा शिवाजी म्हेत्रे रा दमाणीनगर, सोलापूर यांनी अज्ञात इसमाविरुध्द फिर्याद दिली आहे.
याबाबत , फिर्यादी सुनंदा म्हेत्रे यांच्या नातूचे नाव ठेवण्याचा कार्यक्रम नाशिक येथे असल्याने कुटुंबातील सर्व लोक एकत्रित येऊन आटपाडी येथील फिर्यादीचा भाऊ विजय बबन औंधकर यांचेकडे जाणे साठी शुक्रवारी दुपारी अडीच वाजता सोलापूर ते आटपाडी एसटी बस मधून निघाल्या होत्या. यावेळी त्यांनी त्यांच्याकडील ५ तोळे सोन्याचे गंठण,२ तोळे सोन्याचे साखळी,२ तोळे सोन्याचे नेकलेस, १.५ तोळे सोन्याचे लक्ष्मीहार, अर्धा तोळे सोन्याची अंगठी,४ ग्राम सोन्याचे टाॅप्स, सोन्याचा बदाम व मणी असे ११ तोळे ९ ग्राम सोन्याचे दागिने, रोख रक्कम १० हजार रुपयेसह ५ हजार रुपयेचा मोबाईल राखाडी रंगाच्या पर्स मध्ये ठेवले होते. एसटी बस सोलापूर येथून पंढरपूरला आल्यानंतर ड्रायव्हरच्या पाठीमागील सीट मोकळी झाल्याने त्या पुढच्या सीटवर बसल्या त्यानंतर एसटी बस आटपाडीकडे मार्गस्थ झाली या दरम्यान अज्ञात इसमाने सदर राखाडी रंगाची दागिने असलेली पर्स घेऊन महूद गावात उतरून धूम ठोकली त्यावेळी फिर्यादी सुनंदा म्हेत्रे यांना सीटवर ठेवलेली पर्स गायब असल्याचे लक्षात येताच त्यांनी कंडक्टरला या घटनेची माहिती दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!