crime
*गर्दीचा फायदा घेऊन चोरट्याने महिलेच्या पर्स मधील ६ हजार पाचशे रुपये चोरले….तपास कामासाठी आलेल्या पोलिस हवालदाराने माणुसकी दाखवत महिलेची केली मदत….*
सांगोला ( प्रतिनिधी) खरसुंडीला श्रीसिद्धनाथ यात्रेला देवदर्शनासाठी एसटी बसमधून निघालेल्या प्रवासी महिलेच्या पर्स मधून गर्दीचा फायदा घेऊन कोणीतरी अज्ञात व्यक्तीने ६ हजार ५०० रुपये लंपास केल्याची घटना शनिवार दि.४ मे रोजी सायं.सव्वापाच वा.च्या घडली होती एसटी कंडक्टरने एसटी सांगोला बसस्थानकावर आणून पोलिसांना पाचारण केले पोलिसांनी प्रवाशांकडे चौकशी केली परंतु पैसे मिळून आले नाहीत. अखेर पोलीस हवालदार संतोष देवकर यांनी माणुसकी दाखवून सदर प्रवासी महिलेस घरी जाणेसाठी ५०० रुपयेची मदत केल्याने महिलेने त्यांचे आभार मानले.
सोलापूर-बार्शी रोडवरील कारंबा ( पांढरे वस्ती ) येथील एक विवाहित महिला तिचा लहान मुलगा, सासू व मावस सासू असे मिळून काल शनिवार दि.४ एप्रिल रोजी दु .१२ वा.घरातून खरसुंडी ता आटपाडी येथील श्री सिध्दनाथ देवाच्या देवदर्शन करण्यासाठी सोलापूर येथून एसटी बसने निघाले होते दुपारी साडेचार वा.च्या सुमारास सांगोला बसस्थानकावर उतरले व सायंकाळी ५ च्या सुमारास ते सर्वजण एम एच १४ बीपी-३७६७ यां आटपाडी आगाराच्या एसटी मधून खरसुंडीला निघाले होते एसटीत गर्दी खूप होती सदर महिलेने पर्समधील ७ हजार रुपये पैकी ५०० रुपये काढून कंडक्टर कडून तिकीटे काढली व पुन्हा उर्वरित ६,५०० रुपये पर्स मध्ये ठेवले प्रवासादरम्यान एसटीत गर्दी खूप असल्याने कोणीतरी त्यांच्या पर्समधून पैसे काढून घेतले दरम्यान महिलेने अचानक पर्समध्ये पाहिले असता पाकिटातील सर्व पैसे चोरीला गेल्याचे तिने कंडक्टरला सांगितले असता कंडक्टरने बस कमलापूर येथून एसटी परत सांगोला बसस्थानकावर आणली व सदर घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलीस हवालदार संतोष देवकर , पोलीस हवालदार तुकाराम व्हरे यांनी बसस्थानकावर येवून बसमधील इतर प्रवाशांकडे चौकशी केली परंतु पैसे न मिळाल्याने सदर प्रवासी महिलेने आता आम्ही घरी कसे जायचे, माझ्याकडे तिकीटाला सुध्दा पैसे नाहीत म्हणून रडू लागल्याने हवालदार संतोष देवकर यांनी माणुसकी दाखवत महिलेला घराकडे परत जाणेसाठी ५०० रुपये देवून मदत केली. मात्र याबाबत रात्री उशिरापर्यंत पोलिसात गुन्हा दाखल झाला नव्हता.