जवळे ग्रामपंचायत कार्यालयात कार्यतपस्वी आमदार कै. काकासाहेब साळुंखे-पाटील यांची पुण्यतिथी साजरी.

जवळे( प्रशांत चव्हाण) सांगोला तालुक्याचे भाग्यविधाते कार्य तपस्वी आमदार कै.काकासाहेब साळुंखे-पाटील यांची पुण्यतिथी जवळे ग्रामपंचायत कार्यालयात साजरी करण्यात आली.
यावेळी आमदार कै काकासाहेब साळुंखे-पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन सरपंच सौ.सुषमाताई घुले-सरकार व जवळे गावचे तंटामुक्ती अध्यक्ष श्री.अरुण भाऊ घुले-सरकार यांच्या हस्ते करून अभिवादन करण्यात आले.तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन माजी सरपंच श्री.दत्ता बर्वे यांच्या हस्ते करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी उपसरपंच श्री. नवाज खलिफा,श्री.सुनील आबा साळुंखे,श्री.अनिल सुतार माजी उपसरपंच श्री.बाबासो इमडे,श्री.अनिल साळुंखे(चेअरमन) श्री.सिताराम मेटकरी,श्री.विठ्ठल वाघमारे श्री.महादेव वाघमारे श्री.पोपट नाडगे,श्री.विजयकुमार वाघमारे,श्री.बालाजी साळुंखे श्री.प्रकाश गोरे, ग्रामविकास अधिकारी श्री.दत्तात्रय रसाळ भाऊसाहेब ग्रामपंचायत सदस्य श्री.विठ्ठल गयाळी,श्री.निसार शेख,श्री.विजयकुमार तारळकर,श्री.बंडू साळुंखे यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचारी वर्ग व ग्रामस्थ उपस्थित होते.