सांगोला तालुकामहाराष्ट्रराजकीय

कार्यकर्त्यांच्या मनातील आवाज ऐकून दिपकआबांनी तुतारी हाती घ्यावी

महूद (वार्ताहर.):माढा लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवारीचा सस्पेन्स दिवसेंदिवस वाढत चालला आहे. अशातच अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी कार्यकर्त्यांच्या मनातील आवाज ऐकून शरदचंद्रजी पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घ्यावा आणि हाती तुतारी घ्यावी. असे प्रतिपादन माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांचे विश्वासू सहकारी व समस्त ग्रामदैवत महूद गावचे चेअरमन कैलास (आबा) खबाले यांनी केले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील हे शरदचंद्र पवार यांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जात होते. २००९ रोजी माढा लोकसभा मतदारसंघात खा शरदचंद्र पवार यांनी निवडणूक लढवली होती यावेळी दिपक आबांनीच या निवडणुकीची सूत्रे आपल्या हाती घेतली होती या निवडणुकीत त्यांनी प्रचारप्रमुख म्हणून काम पाहिले होते. यांनतर लागोपाठ दोनवेळा म्हणजे २०१४ (विजयसिंह मोहिते पाटील) आणि २०१९(संजयमामा शिंदे) लाही राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा प्रचारप्रमुख म्हणून दिपकआबांनी काम पाहिले होते. मात्र गतवर्षी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर त्यांनी अजितदादा पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या भगिनी आणि सोलापूर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा जयमालाताई गायकवाड यांनी मात्र आपल्या भावाची साथ सोडत शरदचंद्र पवार यांच्या सोबतच राहणे पसंत केले.

पुढे बोलताना युवा नेते कैलास आबा खबाले म्हणाले, राज्यात सत्ताधारी असलेल्या महायुती सरकारने सामान्य शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. शिवसेना शिंदे गटाचे एकनाथ शिंदे यांनी आणि राष्ट्रवादी अजित पवार गटांनी आपल्या पक्ष आणि नेत्यांचा केलेला विश्वासघात जनतेला अजिबात आवडला नाही शिवाय कोणतेही कारण नसताना राज्यातील सरकारने राज्यात गुण्यागोविंदाने राहणाऱ्या मराठा आणि ओबीसी बांधवांत जाणीवपूर्वक संघर्ष निर्माण केला. राज्यातील महत्त्वाची कार्यालये आणि प्रकल्प राज्याबाहेर गेले त्यामुळे सामान्य जनता केंद्रात आणि राज्यात सत्तेवर असलेल्या सरकारवर प्रचंड चिडून आहे दिपकआबांनी सामान्य लोकांच्या मनातील चीड ओळखावी आणि आपल्या कार्यकर्त्यांच्या मनातील आवाज ऐकून शरदचंद्रजी पवार यांच्यासोबत जावे आणि हाती तुतारी घेऊन लोकप्रिय नेते निलेश लंके यांच्याप्रमाणे लोकसभेची निवडणूक लढवावी अशी मागणीही शेवटी कैलास आबा खबाले यांनी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!