पं.दीनदयाळजींच्या विचारांचा भाजपाच्या कार्यकर्त्यांवरील सेवेचा संस्कार – चेतनसिंह केदार- सावंत

सांगोला (तालुका प्रतिनिधी): पंतप्रधान नरेंद्र मोदी राबवत असलेल्या गरीब कल्याणाच्या योजना पंडीत दीनदयाळ उपाध्याय यांच्या विचारांवर आधारित आहेत. भाजपाच्या कार्यकर्त्यांवरील सेवेचा संस्कार हा पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या विचारांमुळे आहे. भाजपा दीनदयाळजींच्या विचारांवरच वाटचाल करत आहे. भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांवरील सेवेचे संस्कार हे दीनदयाळजींच्या विचारांमुळे झाले असून भाजपा त्यांच्या विचारांवर वाटचाल करत आहे, असे प्रतिपादन भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार- सावंत यांनी व्यक्त केले.
        राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पूर्णवेळ प्रचारक, तत्कालीन जनसंघाचे प्रमुख नेते पंडित दीनदयाळ  उपाध्याय यांची जयंती सांगोल्यात जिल्हा भाजप कार्यालयात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत यांनी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
        पुढे बोलताना भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी राबवत असलेल्या सर्वांसाठी घरे, उज्वला योजना, उजाला योजना अशा गरीब कल्याणाच्या योजनांमध्येही पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या विचारांची प्रेरणा आहे.  पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी महान विचार मांडले आणि जनसंघाच्या माध्यमातून हे तत्त्वज्ञान रुजवले. पक्षाच्या स्थापनेपासून सोळा वर्षे राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून त्यांनी अपार कष्ट करून जनसंघ हा पक्ष वाढविला. माणसाला पोटाबरोबर मनाची, बुद्धीची आणि आत्म्याचीही भूक असते. याचा एकत्र विचार केला पाहिजे, असा आग्रह धरणारा एकात्म मानववाद पंडित दीनदयाळजींनी मांडला. दीनदयाळजींच्या विचारांच्या आधारे पंतप्रधान नरेंद्र मोदी गरीब कल्याणाच्या योजना राबवत आहेत असे त्यांनी सांगितले.
      यावेळी भाजपचे माजी जिल्हा परिषद सदस्य अतुल पवार, नवनाथ पवार, दुर्योधन हिप्परकर, नागेश जोशी, शीतल लादे, संगीता चौगुले, नरेश बाबर, प्रवीण जानकर, विजय इंगोले, संजय गव्हाणे, मानस कमलापूरकर, वसंत सुपेकर, संजय बाबर, मोहन बजबळे, सोयजित केदार, अजित केदार, बाळासाहेब चव्हाण, विनोद उबाळे, रोहित सावंत, अनिकेत शिंदे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button