सांगोला तालुकामहाराष्ट्रराजकीय

राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राचा १९ वा वर्धापन दिन व शेतकरी, उद्योजक चर्चासत्र उत्साहात संपन्न

भारतीय कृषि अनुसंधान परिषद, नवी दिल्ली यांच्या अखत्यारीत असलेल्या सोलापुर स्थित, राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राचा १९ वा वर्धापन दिन सोहळा व शेतकरी-उद्योजक चर्चासत्र दि. २५ सप्टेंबर २०२३ रोजी उत्साहात संपन्न झाले.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मा. डॉ. कैलास मोते, संचालक (फलोत्पादन), कृषी विभाग, महाराष्ट्र शासन व अध्यक्ष म्हणून मा. डॉ. सामी रेड्डी, संचालक, राष्ट्रीय अजैविक ताण व्यवस्थापन संस्था, बारामती पुणे, कार्यक्रमामध्ये सोलापुरातील डाळिंब क्लस्टरसाठी नेमणूक झालेल्या बी. व्ही. जी. ग्लोबल फार्म वर्क्स लिमिटेड व महाराष्ट्र आणि कर्नाटक डाळिंब संघातील पधाधिकाऱ्यांनी उपस्थिती दर्शवली.
वर्धापन दिन कार्यक्रमाच्या सुरवातीला मान्यवराच्या हस्ते दिप प्रज्वलनानंतर, उपस्थितांचे स्वागत केंद्राचे संचालक मा. डॉ. राजीव मराठे यांनी केले व मागील १८ वर्षामध्ये केंद्राने केलेल्या कामाचा आलेख मांडला. डाळिंब उद्योगामध्ये सहभागी असणाऱ्या सर्व भागधारकांना एका व्यासपीठावर आणण्यासाठी या शेतकरी-उद्योजक चर्चासत्राचे आयोजन केले असल्याचे सांगितले.
अखिल भारतीय डाळिंब उत्पादक संघाचे अध्यक्ष, मा. श्री. प्रभाकर चांदणे यांनी केंद्राच्या वर्धापन दिनानिमित्त सर्वांचे अभिनंदन केले व बी. व्ही. जी. ग्लोबल फार्म वर्क्स लिमिटेड आणि डाळिंब संशोधन केंद्र दोघांनी एकत्र येऊन क्लस्टर योजना उत्कृष्टरित्या राबवावी अशी अपेक्षा व्यक्त केली.
यावेळी राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र: एक दृष्टीक्षेप; केंद्राची प्रोफाइल, डाळिंबातील मिली बग आणि त्याचे व्यवस्थापन, जानेवरी ते जून २०२३ चे ई वृत्तपत्र, डाळिंब प्रक्रिया तंत्रज्ञान आणि मूल्यवर्धित उत्पादने व डाळिंबासाठी विश्लेषणात्मक पुस्तिका या प्रकाषणांचे प्रकाशन झाले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते भारती ग्रीन टेक दहीवडी यांच्यासोबत तंत्रज्ञान हस्तांतरण करार झालेल्या उर्वा पी२के२ हे जैविक उत्पादन प्रकाशित करण्यात आले.
अध्यक्षीय भाषणात मा. डॉ. सामी रेड्डी, यांनी कमी खर्चात जास्त उत्पादन घेता येऊ शकेल असे तंत्रज्ञान विकसित करण्यावर भर दिला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मा. डॉ. कैलास मोते, संचालक (फलोत्पादन), कृषी विभाग, महाराष्ट्र शासन यांनी एकट्या सोलापूर जिल्ह्यात या क्लस्टरद्वारे डाळिंबातील अत्याधुनिक तंत्रज्ञानासह पायाभूत सुविधांवर सुमारे २४७ कोटी ६७ लाख रुपये खर्च होणार आहेत व या योजनेतून डाळिंबासाठी कृषिमूल्य साखळी विकसित होईल त्यानुसार उत्पादनापासून ते अगदी मार्केटिंगपर्यंतचे सर्व लाभ या क्लस्टरमधून शेतकऱ्यांना पुरविण्यात येतील असे सांगितले. यावेळी केंद्रातील कर्मचारी याचा उत्कृष्ट कार्याबद्दल संस्थेतर्फे विविध पुरस्कार देवून गौरव करण्यात आला. यामध्ये उत्कृष्ट तांत्रिक अधिकारी पुरस्कार श्री. भाऊसाहेब नाईकवाडी, उत्कृष्ट प्रशासकीय सेवेसाठी श्री. आबासाहेब बाबर, कुशल सपोर्ट कर्मचारी म्हणून श्री. विशाल गंगणे यांना पुरस्कार देण्यात आले. डाळिंब प्रक्रिया उद्योजक म्हणून श्री. मदन कुलकर्णी, (कार्वी ऍग्रो प्रोसससिंग कंपनी, सोलापूर), त्यानंतर प्रगतशील डाळिंब उत्पादक म्हणून श्री. प्रकाश बाफना, बाफना कंपनी (अहमदाबाद, गुजरात), श्री. मुनेगौडा जि. सी., (बेंगळुरू, कर्नाटक), श्री. श्याम गोडसे (पंढरपूर) आणि श्री. आबा जाधव (सटाना-नाशिक) यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
दुपारच्या सत्रामद्धे शेतकरी व विविध उत्पादक कंपन्या यामध्ये चर्चासत्र संपन्न झाले. यामध्ये जैन टिशू कल्चर, गुगळे बायोटेक, बेयर क्रॉप, यू पी एल, यासारख्या जवळपास १० कंपन्यांनी व १६० शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला. कार्यक्रमास मा. श्री. दत्तात्रय गवसाने, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, सोलापूर; डॉ. नितीनकुमार रणशूर, मुख्य शास्त्रज्ञ आणि सहयोगी संशोधन संचालक, विभागीय कृषी संशोधन केंद्र, सोलापूर, मा. डॉ. लालासाहेब तांबडे, प्रमुख, कृषि विज्ञान केंद्र, सोलापूर, केंद्राच्या संशोधन सल्लागार समितीचे सदस्य मा. श्री. शंकर वाघमारे, कर्नाटक डाळिंब संघाचे मानद अध्यक्ष श्री. नंजुंदेगौडा बी. हेही उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. नीलेश गायकवाड व डॉ. नम्रता गिरी यानी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!