सांगोला तालुकाक्रीडाशैक्षणिक
जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत जवळा विद्यालयाचे घवघवीत यश.
जवळा (प्रशांत चव्हाण) सोमवार दिनांक 25 सप्टेंबर रोजी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत कै. सौ. वत्सलादेवी देसाई विद्यालय व कै.अण्णासाहेब घुले- सरकार कनिष्ठ महाविद्यालय जवळा या प्रशालेतील खेळाडूंनी घवघवीत यश प्राप्त केले आहे.
या विद्यालयातील 14 वर्षे वयोगटातील मुलींच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावला असून त्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या यशाबद्दल संस्थाध्यक्ष मा.आ. श्री.दीपक आबा साळुंखे-पाटील, संस्था सचिव श्री.सुभाष लऊळकर सर,प्राचार्य श्री.बाळासाहेब शिंदे सर,मार्गदर्शक श्री. चडचणकर सर,श्री.पाटील सर,श्री.लांडगे सर सर्व शिक्षक स्टाफ यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत