सांगोला तालुका

सांगोला तालुक्यात टँकरद्वारे मोफत पाणीपुरवठा; सोनलवाडी, बागलवाडी भागात उत्कर्ष ग्लोबल फाऊंडेशनचा पुढाकार

सांगोला : सोनलवाडी, बागलवाडी या भागात उत्कर्ष ग्लोबल फाऊंडेशनच्यावतीने टँकरच्या साहाय्याने पिण्याचा पाणीपुरवठा करण्यात येत आहे. ही एक समाधानाची बाब आहे. या मोहिमेमुळे सुमारे ८०० पेक्षा जास्त ग्रामस्थांना आनंद झाला.
‘उत्कर्ष ‘ने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सहकार्याने सोलापूर जिल्ह्यात उत्कर्ष दुष्काळ निवारण प्रकल्प-२०२४ प्रारंभ केला. ते सांगोल्यातील दुष्काळग्रस्त गावकऱ्यांपर्यंत पोहोचले. या भागातील प्रत्येक गावात शनिवार, दि. ११ रोजी एकूण तीन पाण्याच्या टँकरद्वारे गावकरी व जनावरांना १२००० लिटरपेक्षा जास्त पिण्याचे पाणी मोफत वाटप करण्यात आले.
याप्रसंगी सोनलवाडीचे सरपंच महादेव बुरंगले, बागलवाडीचे सरपंच तुकाराम अडसूळकर, एकतपूरचे सरपंच विकास इंगोले, समाजसेवक नंदकुमार यादव उपस्थित होते. त्याचप्रमाणे उत्कर्ष संघाचे उपाध्यक्ष आतिश वाघमारे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. ‘उत्कर्ष’चे सदस्य विनोद व जनसंपर्क अधिकारी हर्षवर्धन वाघमारे यांनीदेखील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी साथ दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!