सांगोला तालुकामहाराष्ट्र

सांगोला बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी अ‍ॅड.राजेंद्र चव्हाण, उपाध्यक्षपदी अ‍ॅड.सचिन बाबर, सचिवपदी अ‍ॅड.राहुल सरगर तर सहसचिव पदी अ‍ॅड.सुयश बनसोडे

सांगोला (प्रतिनिधी):- सांगोला बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी अ‍ॅड.राजेंद्र पांडुरंग चव्हाण, उपाध्यक्षपदी अ‍ॅड.सचिन जगन्नाथ बाबर,  सचिवपदी अ‍ॅड.राहुल शिवाजी सरगर तर सहसचिव पदी अ‍ॅड.सुयश किशोर बनसोडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

 

सांगोला बार असोसिएशनच्या सन 2024-2025 या वर्षाकरिता नूतन पदाधिकार्‍यांची निवड नुकतीच संपन्न झाली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अ‍ॅड.दत्तात्रय घाडगे व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अ‍ॅड.राहुल सरगर यांनी काम पाहिले. यावेळी बार असोसिएशनच्या सदस्यांनी नूतन पदाधिका र्‍यांचे अभिनंदन करून आपले मनोगत व्यक्त केले व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या

नूतन अध्यक्ष अ‍ॅड.राजेंद्र चव्हाण यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, सर्व बार सदस्यांना विश्वासात घेऊन ज्येष्ठ सदस्यांच्या मार्गदर्शनाखाली व पदाधिकार्‍यांना सोबत घेऊन आपण आपले कामकाज करू असा विश्वास देऊन सर्वांच्या आभार मानले. यावेळी मोठ्या संख्येने बार असोसिएशनच्या सर्व सदस्य उपस्थित होते. यावेळी नवनिर्वाचित पदाधिकार्‍यांचा सत्कार करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!