नाझरा(वार्ताहर):- सांगोला तालुका पावसाळी क्रीडा स्पर्धा सध्या विविध क्रीडा प्रकारात संपन्न होत आहे. हिंदकेसरी आखाडा बामणी या ठिकाणी झालेल्या कुस्ती स्पर्धेमध्ये विद्यानिकेतन हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज गौडवाडी च्या दोन विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक मिळवत बामणीचा आखाडा जिंकला आहे.


फ्री स्टाईल मध्ये 55 किलो वजनी गटात प्रथमेश अमोल करडे या विद्यार्थ्याने प्रथम क्रमांक मिळवला तर ग्रीको रोमन या कुस्ती प्रकारात 55 किलो वजनी गटात रामचंद्र सय्याप्पा आलदर या विद्यार्थ्याने प्रथम क्रमांक मिळवला. यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थेचे सचिव नारायण बापू शेंडगे,प्राचार्य एस.जी.माळी,मार्गदर्शक शिक्षक टी एम चंदनशिव व प्रा. राज कोळेकर तसेच परिसरातील क्रीडाप्रेमी नागरिकांनी केले.
Back to top button