सांगोला तालुकामहाराष्ट्र

आदर्श जीवनशैली ज्येष्ठ नागरिकासाठी  उपयुक्त-डॉ.मकरंद येलपले

चैतन्य हास्य योग मंडळ व चौंडेश्वरी महिला योग मंडळात मार्गदर्शन 

सांगोला- वयाची साठ वर्षे पूर्ण झालेल्या नागरिकांना आपल्याकडे ज्येष्ठ नागरिक म्हणून सम्बोधले जाते.अशा ज्येष्ठ नागरिकामध्ये विशेशतः महिला वर्गात आरोग्याच्या बर्याच तक्रारी ऐकू येतात.या मध्ये गुढघेदुखी,कंबरदुखी,थायरोइड़,स्मृतीभ्रश,अर्धांगवात,साखर,रक्तदाब आदि विविध विकार ज्येष्ठ नागरिकांना सतावत असतात.त्यावर उपाय म्हणून सात्विक आहार, नियमित व्यायाम,सकारात्मक व आनंदी जीवन पद्धती,मित्रांचा सहवास व योग्य आउश्धोपचार या गोष्टींचा अंगिकार केल्यास ज्येष्ठ नागरिक निरामय जीवनाचा आनंद घेऊ शकतात,असे मौलिक विचार डॉ.मकरंद येलपले यानी मांडले.
चौंडेश्वरी मंदिरात आयोजित केलेल्या ज्येष्ठ नागरिकांच्या मेळाव्यात डॉ.येलपले बोलत होते.व्यासपीठावर चैतन्य हास्य योग मन्डळ अध्यक्ष डी.डी.जगताप सर,चौंडेश्वरी महिला योग मन्डळ अध्यक्षा मंगल लाटणे,डॉ.शितल येलपले आदि उपस्थित होते.
 प्रारंभी डॉ.येलपले यानी ज्येष्ठ नागरिकांना उतार वयात भेडसावणारया शारिरीक व्याधींची माहिती दिली.त्याच प्रमाणे या वयात भेडसावणार्या प्रोस्तेड, स्मृतीभ्रन्श, हार्मोन्स बैलेंस,शुगर,बीपी या नेहमीच्या विकारावर मार्गदर्शन केले.त्याच प्रमाणे प्रथिनयुक्त आहार,भरडधान्य आहार,कमीत कमी  कर्बोदकयुक्त आहार घेण्याचे आवाहन केले.नागरिकांच्या विविध प्रश्नाना योग्य उत्तर देत त्यानी संवाद साधला.सन्वादच्या माध्यमातून डॉ.कृष्णा इन्गोले,प्रा.राजाभाऊ ठोंबरे,महादेव झिरपे ,सुधकर म्हेत्रे, ज्योती कांबळे,सरोज खिस्ते,कळसे मैडम,सुर्यवंशी मैडम,सुधीर दौन्डे,अशोक केदार यानी विचारलेल्या विविध प्रश्न व शंका यांचे योग्य उत्तराद्वारे समाधान केले.या वेळी भूलतज्ञ असलेल्या डॉ.शितल येलपले यानी भूल,भूलिचे प्रकार या विषयी माहिती दिली.सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत जगताप सर,आभार प्रदर्शन डॉ.कृष्णा इन्गोले यांनी केले.
सदर कार्यक्रमास चैतन्य हास्य योग मन्डळ,चौंडेश्वरी महिला योग साधना मंडळाचे सदस्य,शहरातील पत्रकार उत्तम चौगुले,डॉ.अनिल कांबळे,डॉ.गणपतराव मिसाळ,नारायण चव्हाण,विश्वेश्वर कोठावळे ,सेवानिवृत्त प्राचार्य बजरंग लिगाडे यांच्या सह अनेक ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!