सांगोला तालुकामहाराष्ट्रशैक्षणिक

शिक्षक शेख यांनी वर्गात विद्यार्थ्यांसाठी घेतले स्वखर्चातून दोन लाख रुपये किमतीचे इंटरएक्टिव्ह फ्लॅट पॅनेल बोर्ड

सांगोला – एकविसाव्या शतकात शहरातील विद्यार्थ्याप्रमाणे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ही अध्ययन अध्यापनासाठी अत्याधुनिक शैक्षणिक साहित्य मिळावे यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सांगोलकर गवळीवस्ती (तरंगेवाडी) ता-सांगोला शाळेतील उपक्रमशील शिक्षक खुशालद्दिन शेख यांनी स्वखर्चातून दोन लाख रुपये किमतीचा वर्गात विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी इंटरएक्टिव्ह फ्लॅट पॅनेल बोर्ड घेतला आहे.

त्या इंटरएक्टिव्ह फ्लॅट पॅनेल बोर्डचे उदघाटन सोलापूर जिल्हा परिषदेचे प्राथमिक उपशिक्षणाधिकारी संजय जावीर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी सांगोला पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी सुजय नवले, ज्येष्ठ विस्ताराधिकारी दिगंबर गायकवाड, जवळा बीटचे विस्ताराधिकारी लक्ष्मीकांत कुमठेकर, जवळा केंद्राचे केंद्रप्रमुख तानाजी साळे, केंद्रीय मुख्याध्यापक मनोहर इंगवले उपस्थित होते.

 

इंटरएक्टिव्ह फ्लॅट पॅनेल बोर्डच्या साह्याने शिक्षक व विद्यार्थी व्हाईस कमांडने किंवा टच स्क्रीनच्या साह्याने पाठ्यपुस्तकातील कोणताही घटक पाहू शकतात, त्यावर दोन किंवा चार ओळीत लेखन करणे, विविध आकृत्याचे आकार काढणे, चित्र काढणे, मराठी, गणित व इंग्रजी विषयाच्या अभ्यासाच्या गेम खेळणे, ऑनलाईन शालेय माहिती अभ्यासणे यासारखे अनेक घटक विद्यार्थी त्यावर स्वतः करू शकतात.

 

यावेळी कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा आशा तळे, माजी सरपंच सुरेश गावडे, जयश्री खताळ, जवळा केंद्रातील सर्व शाळेचे मुख्याध्यापक व पालक बहुसंख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक सुहास कुलकर्णी यांनी केले तर आभार गणेश व्हनखंडे यांनी केले

——–

मी दर महिन्याला पगारातून पंधरा हजार रुपये शाळेत शैक्षणिक उपक्रम राबवण्यासाठी बचत करतो त्यातून आतापर्यंत वर्गात डिजिटल जंगल क्लासरूम, सुसज्ज ग्रंथालय, अहुजा साऊंड सिस्टिम, सीसीटीव्ही कॅमेरा, हार्डमॅट, दरवर्षी वर्गाला रंगरंगोटी व लेझर लाईटची सुविधा, लॅपटॉप, प्रोजेक्टर,गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, पर्यावरण संवर्धन करण्यासाठी वटवृक्ष लागवड असे अनेक घटकासाठी आतापर्यंत स्वखर्चातून नऊ लाख रुपये खर्च केले आहेत
खुशालद्दीन शेख( उपशिक्षक)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!