सांगोला तालुका

उत्कर्ष विद्यालयात मंथन प्रज्ञाशोध परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व वासंतीक वर्गाचा समारोप संपन्न

फेब्रुवारी 2024 मध्ये घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय मंथन प्रज्ञाशोध परीक्षेत उत्कर्ष प्राथमिक व माध्यमिक विद्यालयातील एकूण 19 विद्यार्थ्यांनी केंद्रात,जिल्ह्यात व राज्यात गुणवत्ता यादीत स्थान पटकावून विद्यालयाचा नाव लौकिक वाढवला आहे. *दिनांक- 20/ 4 /2024  वार -शनिवार* उत्कर्ष विद्यालय गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ व वासंतीक वर्गाचा निरोप समारंभ आयोजित केलेला होता. तेव्हा व्यासपीठावर संस्थाध्यक्ष मा.डॉ. संजीवनीताई केळकर,कोषाध्यक्ष डॉ. शालिनीताई कुलकर्णी, शिक्षण विभाग प्रमुख नीलिमाताई कुलकर्णी पूर्व प्राथमिकच्या मुख्याध्यापिका सुनीताताई कुलकर्णी, प्राथमिकच्या उपमुख्याध्यापिका स्वरालीताई कुलकर्णी, माध्यमिकचे मुख्याध्यापक श्री.सुनील कुलकर्णी सर पर्यवेक्षक भोसले सर, मिसाळ सर उपस्थित होते.
 कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजन व प्रार्थनेने झाली. नंतर वसंतऋतुचे महत्व व वासंतीक वर्गातील विविध उपक्रम हे शिक्षक मनोगतातून  अनुराधाताई लिंगे यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी वासंतीक वर्गात आलेले अनुभव मुक्तपणे मांडले. व हा वर्ग खूप आवडला, अभ्यासाबरोबर इतर काही छान शिकायला मिळाले असे आपल्या मनोगतातून व्यक्त केले.
गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांच्या यादीचे वाचन  माधवीताई पवार यांनी केले. पहिली ते सातवी  पर्यंतचे विद्यार्थी होते.   चि. अभंग हरिदास जाधव   राज्यात 20 वा ,चि. श्रीहरी दीपक भाकरे  राज्यात 10वा, चि.राजवीर नवनाथ शेळके राज्यात 16 वा , चि.राजवीर विजयसिंह घाडगे राज्यात 2 रा,चि.राज मोहन शिंदे  राज्यात27 वा ,चि.अभिराज सतीश सपताळ राज्यात 32 वा ,चि.प्रभव प्रवीण खंडागळे  राज्यात 36 वा, कु. स्नेहा विवेकानंद पाटील  राज्यात 31वी, कु.मनस्वी मंगेश कुलकर्णी  राज्यात 10वी , कु.भार्गवी रवी कुंभार  राज्यात 17 वी,कु.शर्मिन रियाज मणेरी  राज्यात26 वी, चि. धैर्यशील अरुण पाटील राज्यात 28 वा, कु.तन्वी सागर चंदनशिवे  राज्यात 30वी,  चि.ओजस अभिजित पाटणे राज्यात 34 वा,कु.मैत्रेयी प्रमोद वेदपाठक राज्यात 35 वी , कु. वेदांगी दत्तात्रय शिंदे राज्यात 5 वी, कु. श्रेया निलेश मडके राज्यात 23 वी ,चि. प्रेम विशाल हागरे राज्यात 24 वा ,चि. तन्मय सतीश सपताळ राज्यात 55  वा
     यानंतर  विद्यार्थ्यांना डॉ. संजीवनी ताई केळकर,शालिनीताई कुलकर्णी, नीलिमाताई व सुनील कुलकर्णी सर यांनी वाचन वाढवा, व्यवहार ज्ञान समजून घ्या, मनाचे श्लोक वाचा, शिक्षकांबद्दल आदर कायम ठेवा, पाढे पाठांतर करा. स्वतःला गुणदोषांसह ओळखा व अभ्यासाबरोबर मैत्री करा. एक चांगला आदर्श माणूस घडा  असे मोलाचे मार्गदर्शन केले.
फरीदा शेख यांच्या आभाराने कार्यक्रमाची सांगता झाली. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गौरी मिसाळ यांनी केले सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम छान पार पडला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!