सांगोला तालुकामहाराष्ट्रराजकीय

माजी. जि .प .सदस्य श्रीकांत दादा देशमुख यांचा गौडवाडी गावात संवाद दौरा टेंभू व म्हैशाळ रखडलेल्या योजना खासदार रणजीत सिंह निंबाळकरांच्या रेट्याने व देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्याने हजारो कोटीच्या पुरेशा निधीने पूर्णत्वास गेल्या श्रीकांत दादा देशमुख

सोलापूर जिल्हा दक्षता व सनियंत्रण समितीचे विद्यमान सदस्य व सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी बिनविरोध सदस्य श्रीकांत दादा देशमुख यांचा सांगोला तालुक्यातील गौडवाडी गावात जनसंवाद गाव भेट दौरा व कॉर्नर सभेचे आयोजन करण्यात आले होते

त्यांच्यासोबत कोळा भागाचे भाजपाचे नेते भाजपा ओबीसी मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष उत्तम भाऊ आलदर भाजपा जिल्हा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष हनुमंत सरगर व कोळा ग्रामपंचायतचे सदस्य संदीप आंदर माळाप्पा गरंडे बिरा लवटे इत्यादी उपस्थित होते वाद्याच्या गजरात व फटाक्याच्या आतसबाजीने स्वागत करण्यात आले सुहासिनीनी औक्षण केले मान्यवरांचा सत्कार गौडवाडी.चे तंटामुक्त अध्यक्ष व ग्रामपंचायत सदस्य महादेव आलदर उपसरपंच राजाभाऊ गुळीग माजी उपसरपंच रविभाऊ शेंडगे तालुका भाजपा संघटक माणिकराव सकट ग्रामपंचायत सदस्य विकास गडदे ग्रामपंचायत सदस्य अशोक कांबळे माजी ग्रामपंचायत सदस्य दादासो कांबळे यांनी केला

 

 

गावातील ग्रामस्थ व पदाधिकारी यांनी अडचणी व समस्या मांडल्या संजय गांधी बहुतांशी प्रकरणी रद्द केली आहेत ती पूर्ववत करावी टेंभू पाण्याचे आवर्तन लवकर सोडावे अशा मागण्या मांडल्या त्यांचा पाठपुरावा करून सोडवण्याचे आश्वासन श्रीकांत दादांनी दिले मान्यवरांची मनोगत झाल्यानंतर आपल्या मनोगताचे व्यक्त करताना श्रीकांत दादा देशमुख म्हणाले की सांगोला तालुका दुष्काळी तालुका रोजगार हमी व ऊसतोड कामगारानचा तालुका अशी ओळख होती अठरा विश्व दारिद्र्य व प्रत्येक जण जन्मताच दुष्काळाचा शिक्का कपाळावर मारून जन्माला येत होता शेतीच्या पाण्याच्या टेंभू योजना व म्हैसाळ योजना निधी अभावी रखडल्या होत्या त्या योजना गेल्या लोकसभा निवडणुकीत पूर्ण करण्याच्या आणि शेतीच्या पाणी प्रश्नावर निवडणूक लढविण्याची वेळ येऊ देणार नाही असा शब्द खासदार रणजीत सिंह निंबाळकर यांनी जाहीर रित्या दिला होता तो त्यानी तत्कालीन जलसंपदा मंत्री देवेंद्र फडवणीस व गिरीश महाजन यांच्या सहकार्याने केंद्रातला व राज्यातला हजारो कोटीचा निधी मंजूर करून आणला आणि योजना बंदिस्त पाईप सह पूर्ण केल्या त्यामुळे आज सांगोला तालुक्यातील अर्धा तालुका कोळागट जवळा गट नाझरा गट कडलास गटातील गावेच्या गावे तलावात पाणी सोडल्याने डाळिंब बागा व इतर फळबागा जनावराचा चारा उसाचे क्षेत्र वाढत आहे याचे श्रेय फक्त माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांना जाते ते नेहमी सांगतात भाजप पक्ष जा कामाचे भूमिपूजन करतो त्या कामाचे उद्घाटनही करतो श्रीकांत दादांनी केंद्रातील मंत्री मंडळात रणजितसिंह निंबाळकरांचे शब्दाला मोठी किंमत असल्याच्या किस्सा याप्रसंगी सांगितला.

 

रेल्वे भरतीमध्ये एक किचकट आठ होती ती रद्द झाल्यानंतर माढा लोकसभा मतदारसंघातील तीनशे उमेदवारांना नियुक्तीपत्रे मिळून त्त्यांना कायमची नोकरी मिळणार होती त्या तीनशे मध्ये तुमच्या गौडवाडी गावातला दर्याबा बंडकरून यांचा मुलगा होता तुमच्या सर्वात माझ्यापुढे कॉर्न सभेला ते बसले आहेत खासदारानी रेल्वेमंत्री यांना फोन केला ती जाचकअट रद्द केली ती त्यांचे कुटुंबाचे संसार उभे करण्याचा त्यांचा सिंहाचा वाटा आहे असे दादांनी सांगितले गेल्या दहा वर्षात मोदी सरकारने 150 योजना गोरगरीब लाभार्थींना दारिद्र रेषा ओलाढण्यासाठी जाहीर केल्या व 25 कोटी कुटुंबांना दारिद्र रेषे बाहेर काढले अशा काही महत्त्वाच्या योजना आहेत की त्यामध्ये मोफत घर मोफत शौचालय मोफत गॅस मोफत पाणी मोफत औषध उपचार मोफत आनूदान अल्पभूधारक शेतकऱ्यांना वर्षाला अनुदान या योजनाची माहिती लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने सविस्तर सांगितल्या व कामाचा माणूस म्हणून विश्वास ठेवून परत माढा लोकसभा मतदारसंघाचा विकास करण्यासाठी नरेंद्र मोदी ने खासदार निंबाळकरांना पहिल्या यादी उमेदवारी दिली आहे त्यांचे चिन्ह कमळ आहे त्या समोरील बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले

 

हा जनसंवाद दौरा व कॉर्नर सभेचे आयोजन सचिन पांढरे हनुमंत पाटील युवा नेते विशाल गुळीग निवास बनसोडे दर्याबा बंडगर समाधान शिंदे सावंत कांबळे पांढरे सावकर ज्ञानू काळे आप्पा कांबळे संजय गडदे मुकादम विशाल हातेकर अमोल गोळीग समाधान गडदे संजय वाघमारे संतोष गुळीग नामदेव आलदर वाहिदआतार अंकुश करंडे सुखदेव शिंगाडे शहाजी करंडे विक्रम गोळीग आबासो गुळीक प्रमोद कांबळे भाऊसो माळी रवी पोरे गोविंद खंडागळे नंदू खंडागळे माणिक शेंडगे समाधान कांबळे प्रणव चंदनशिवे समाधान आवळे यांनी केले व आभार गावचे माजी उपसरपंच रविभाऊ शेंडगे व माणिक सकट यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!