सांगोला तालुका

सांगोला नगरपरिषदेच्यावतीने स्वच्छता मशाल रॅली संपन्न

सांगोला(प्रतिनिधी):-स्वच्छ भारत अभियान 2.0 व स्वच्छ सर्वेक्षण 2023 अंतर्गत गृहनिर्माण व शहरी कार्य मंत्रालयाच्या दिलेल्या सूचनानुसार जागतिक महिला दिनानिमित्त संपूर्ण देशात 8 मार्च ते 30 मार्च 2023 या कालावधीत स्वच्छोत्सव-2023 राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या अनुषंगाने सांगोला नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ सुधीर गवळी व अतिरिक्त कर्मचारी यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवार दि. 29 मार्च 2023 रोजी घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने व दिनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने नगरपरिषद कार्यालय पासून ते महात्मा फुले चौक, भोपळे रोड, मुजावर गल्ली, मारूती मंदीर ते जयभवानी चौक व नगरपरिषद कार्यालय पर्यंत स्वच्छता मशाल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

 

सांगोला नगरपरिषदेचे महिला व पुरूष कर्मचारी वृंद यांनी परिसर स्वच्छतेबाबत तसेच कचरा घंटागाडीच टाकावा, ओला सुका कचरा वर्गीकरणाचे महत्व, शून्य कचरा प्रणाली अंतर्गत ओला कचरा घरच्या घरी जिरवण्यासाठी होम कंपोस्टिंग, सुका कचर्‍याचे पुनर्वापर करण्यासाठी जनजागृती, प्लास्टिकचे वापर टाळून कापडी पिशवीचा वापर करणे बाबत, आदि संदर्भात या वेळी मार्गदर्शन करण्यात आले.
त्यानंतर मुख्याधिकारी डॉ सुधीर गवळी व नगर परिषद अधिकारी यांच्या समवेत उपस्थित सर्व महिलांनी स्वच्छते संदर्भातील स्वच्छतेची शपथ घेण्यात आली. त्यानंतर रॅलीचे शुभारंभ करण्यात आला. या रॅलीमध्ये सर्व महिलांनी स्वच्छतेबाबत च्या स्वच्छ सांगोला सुंदर सांगोला या घोषणा दिल्या. या वेळी घनकचरा व्यवस्थापन विभागाचे सर्व स्वच्छता निरीक्षक, स्वछता दूत, बचतगट सदस्य तसेच इतर संबंधित महिला व सफाई कर्मचारी इ उपस्थित होते. सदर मशाल मार्च रॅली यशस्वी पार पाडण्यासाठी सांगोला नगरपरिषदेच्या शहर समन्वयक सौ. तेजश्री निशांत बगाडे मॅडम व कार्यालयीन अधिक्षक श्री. विजयकुमार कन्हेरे व सहा.प्रकल्प अधिकारी श्री. योगेश गंगाधरे व इतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. सदर रॅलीची सांगता स्वच्छतेची शपथ घेवून झाली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!