सांगोला तालुका

अधिक मासानिमित्त नाझरे येथील दिंडीचे भक्तिमय वातावरणात सांगता समारंभ संपन्न

नाझरे (प्रतिनिधी):-अधिक मासानिमित्त नाझरे ता सांगोला येथील दिंडीचा सांगता समारंभ भक्तिमय वातावरणात संपन्न झाला 18 जुलै रोजी दिंडी सोहळ्यात सुरुवात झाली व 16 ऑगस्ट रोजी सांगता झाली.यावेळी महाप्रसादाचे वाटप ही करण्यात आले

अधिक महिन्यातील  शेवटच्या दिवशी श्री विठ्ठल मंदिर, संग्राम चौक, आझाद चौक, माऊली चौक, शंकर चौक, वीरभद्र मंदिर, महादेव मंदिर, मारुती मंदिर व कृष्ण मंदिर येथे सांगता होऊन त्यांचा भक्तिमय वातावरणाने महिना कधी संपला हे समजले नाही असे दिंडी सोहळ्यातील अनेकांनी सांगितले.

दिंडी सोहळ्यात महिलांची संख्या जास्त होती व महिलांनी भक्ती गीते गवळणी भारुड अभंग फेर धरून व फुगडी खेळून अत्यंत दिमागदार सोहळा संपन्न केला व यावेळी पुरुष वर्गाने त्यांना साथ चांगली दिल्याने दिंडी रंगतदार भक्तीमय साजरी केल्याने सर्वांचे कौतुक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!