पालकमंत्रिपदांचा तिढा सुटला

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील ११ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारीत यादी बुधवारी (४ ऑक्टोबर) जाहीर केली. या सुधारित यादीनुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देण्यात आले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुण्याचे पालकमंत्रीपद आले आहे. पुणे हा अजित पवारांचा बालेकिल्ला मानला जातो. पण राज्य सरकारमध्ये कालपर्यंत मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे पुण्याचे पालकमंत्री पद होते. जे आज पुन्हा अजित पवार यांच्याकडे देण्यात आले आहे. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांची उचलबांगडी करत अजित पवारांनी पुण्याचे पालकमंत्रीपद राखले आहे. त्यामुळे अजित पवार हेच पुण्याचे कारभारी ठरले आहेत.
अकोला – राधाकृष्ण विखे- पाटील
अमरावती – चंद्रकांत पाटील
भंडारा – विजयकुमार गावित
बुलढाणा – दिलीप वळसे-पाटील
कोल्हापूर – हसन मुश्रीफ
गोंदिया – धर्मरावबाबा आत्राम
परभणी – संजय बनसोडे
नंदूरबार – अनिल भा. पाटील
वर्धा – सुधीर मुनगंटीवार