राजकीयमनोरंजनसांगोला तालुका

महायुतीचे उमेदवार खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्या प्रचारार्थ सांगोल्यात गावभेट दौरा

 

सांगोला (तालुका प्रतिनिधी): माढा लोकसभेचे महायुतीचे उमेदवार खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्या प्रचारार्थ बुधवार २४ एप्रिल आणि गुरुवार २५ एप्रिल रोजी सांगोला तालुक्यात गावभेट दौरा आयोजित करण्यात आला आहे. महायुतीचे उमेदवार खासदार रणजितसिंह निंबाळकर, आमदार शहाजीबापू पाटील, माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत घेरडी आणि कोळा या ठिकाणी जाहीर सभेचे आयोजन करण्यात आलेअसल्याची माहिती महायुतीच्या वतीने देण्यात आली आहे.

माढा लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्या प्रचारार्थ सांगोला तालुक्यात दोन दिवसांचा गावभेट दौरा आयोजित करण्यात आला आहे. २४ एप्रिल रोजी सकाळी आठ वाजता चिकमहुद, लक्ष्मीनगर, महिम कारंडेवाडी, खिलारवाडी, गायगव्हाण, हलदहिवडी, वाकीशिवणे, शिवणे या गावातील कार्यकर्त्याची बैठक महूद गावात आयोजित केली आहे. सकाळी ९ वाजता कटफळ (कटफळ व इटकी गावातील कार्यकर्ते), १० वाजता खवासपूर, ११ वाजता लोटेवाडी (लोटेवाडी, अचकदाणी, ठोंबरेवाडी), १३ वाजता एखतपूर, दुपारी १ वाजता अजनाळे (अजनाळे, लिगाडेवाडी, वझरे, चिणके), २ वाजता य. मंगेवाडी, ३ वाजता वाटंबरे (वाटंबरे, राजुरी), ४ वाजता नाझरे (नाझरे, अनकढाळ), सायंकाळी ५ वाजता बलवडी, ६ वाजता चोपडी (चोपडी, बंडगरवाडी) आणि सायंकाळी ७ वाजता घेरडी येथे (घेरडी, हंगीरगे, गावडेवाडी, डिकसळ, पारे, नराळे, हबीसेवाडी) जाहीर सभा होणार आहे.

२५ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजता संगेवाडी (संगेवाडी, शिरभावी, मेटकरवाडी, धायटी), ९ वाजता
मांजरी (मांजरी, देवकतेवाडी, बामणी, देवळे, सावे), १० वाजता वाढेगांव (वाढेगांव, राजापूर), ११ वाजता मेडशिंगी (मेडशिंगी, बुरलेवाडी), दुपारी १२ वाजता आलेगांव, १ वाजता वाकीघेरडी, ३ वाजता वाणीचिंचाळे, ४ वाजता जवळा (जवळा, आगलावेवाडी, तरंगेवाडी, बुरंगेवाडी, भोपसेवाडी), सायंकाळी ५ वाजता कडलास (कडलास, डोंगरगांव, हणमंतगाव, लोणविरे, निजामपूर), ६ वाजता अकोला (अकोला, वासूद, केदारवाडी, कमलापूर, गोडसेवाडी), सायंकाळी ७ वाजता जुनोनी (जुनोनी, काळुबाळुवाडी, ह. मंगेवाडी, जुजारपूर, गुण्णापाचीवाडी, हातीद पाचेगाव खु. मिसाळवाडी, नलवडेवाडी), रात्री आठ वाजता कोळा (कोळा, कराडवाडी, कोंबडवाडी, तिप्पेहळळी, किडबिसरी, पाचेगांव बु., गौडवाडी, बुध्देहाळ, करांडेवाडी) येथे जाहीर सभा होणार आहे.

 

या प्रचार दौऱ्यासाठी महायुतीचे उमेदवार खासदार रणजितसिंह निंबाळकर, आमदार शहाजीबापू पाटील आणि माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर सभा संपन्न होणार आहे. तसेच यावेळी शिवसेना नेते भाऊसाहेब रुपनर, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष तानाजीकाका पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख दादासाहेब लवटे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष मधुकर बनसोडे, भाजप तालुकाध्यक्ष अतुल पवार, दुर्योधन हिप्परकर, रासपचे जिल्हाध्यक्ष सोमा मोटे, आरपीआयचे तालुकाध्यक्ष खंडू सातपुते, मनसेचे जिल्हाध्यक्ष विनोद बाबर उपस्थित राहणार आहेत. तरी महायुतीचे उमेदवार खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्या प्रचार दौऱ्यासाठी आणि जाहीर सभेसाठी महायुतीच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन महायुतीच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!